मराठी बातम्या /बातम्या /Viral /

सासरी पोहोचताच वहिनीला दीरांनी दिला मोठा धक्का, नवरीसमोर जे केलं ते पाहून सर्वजण शॉक; VIDEO VIRAL

सासरी पोहोचताच वहिनीला दीरांनी दिला मोठा धक्का, नवरीसमोर जे केलं ते पाहून सर्वजण शॉक; VIDEO VIRAL

नवरी घरात पाय ठेवायच्या आधी दीरांनी काय केलं पाहा.

नवरी घरात पाय ठेवायच्या आधी दीरांनी काय केलं पाहा.

नवरी घरात पाय ठेवायच्या आधी दीरांनी काय केलं पाहा.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 25 ऑक्टोबर : लग्नानंतर  (Wedding Video) सासरी जाणाऱ्या नवरीच्या (Bride video) मनात थोडीशी धाकधूक असतेच. घर, माणसं सर्वकाही नवीन असतं. कोणाचा स्वभाव कसा असेल, आपल्याला तिथं कशी वागणूक दिली जाईल, असे बरेच प्रश्न तिच्या मनात असतात. अशाच प्रश्नांसह सासरी पोहोचलेल्या नवरीसोबत असं काही घडलं की तिला धक्काच बसला. सासरच्या घरी पोहोचताच तिच्या दीरांनी तिला झटकाच दिला (Devar Bhabhi Video). नवरीसह इतर पाहुणेही ते पाहून शॉक झाले.

लग्नाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर  (Social Media) व्हायरल  (Viral Video)  होतो आहे. ज्यात दीरांनी नवरीसमोर आपले गुडघे टेकवले आहेत आणि त्यांनी आपल्या वहिनीसमोर मन मोकळं केलं आहे. वहिनीला त्यांनी काहीतरी सांगितलं आहे. व्हिडीओत पाहू शकता नवरी एका ठिकाणी उभी आहे आणि तिचे काही दीर तिच्या समोर येऊन गुडघ्यावर बसलेले दिसत आहेत.

" isDesktop="true" id="622723" >

दीर वहिनीसमोर पंजाबी गाणं लड्डूवर डान्स करत असतात. गाणं गाता गाता ते आपल्या गुडघ्यांवर बसतात. तेव्हा सर्वजण हैराण होतात आणि नवरीसुद्धा लाजते. दीर आपल्या वहिनीला सांगतात, वहिनी माझं ऐका आणि कृपया हसू नका, लग्नाबाबत विचार करून करून मी पिवळा पडलो आहे. दीरांना डान्स करताना पाहून वहिनीही नाचू लागते. ती स्वतःला डान्स करण्यापासून रोखूच शकत नाही.  खूप आनंदात दिसते.

हे वाचा - नवरीला पाहून नवरदेव नाही तर दिरच झाले फिदा; पळत जाऊन मारली मिठी, VIDEO VIRAL

थिंक्स ब्रिफली नावाच्या यूट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे, त्यावर कमेंट केल्या आहेत.

याआधी तर अशा दीराचा व्हिडीओ व्हायरल झाला होता जो आपल्या वहिनीच्या मांडीवरच बसला.  इन्स्टाग्रामवर फॅशन क्लब पूजा 11 नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ (Instagram Reels Video) अपलोड केला गेला आहे.

लग्नानंतर नवरीबाई आपल्या सासरी येऊन आपल्या रुममध्ये बसली. नवरदेवही नवरीसोबतच बेडवर बसला होता. इतक्यात दीर तिथे येतो आणि तो आपल्या वहिनीच्या मांडीवर बसतो. हे पाहून आधी नवरदेव थोडा हैराण होतो. काही ठिकाणी लग्नांमध्ये अशी पद्धत आहे, की दीर सासरी आलेल्या वहिनीच्या मांडीवर जाऊन बसतो. यानंतर काहीतरी भेटवस्तू घेतल्याशिवाय तो उठत नाही.

हे वाचा - भरमंडपात दीराने नवरीसमोर केलं असं काही, थांबवावी लागली सप्तपदी; नेमकं काय घडलं पाहा VIDEO

या व्हिडिओला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं, मला वाटतं, ही एकच अशी जागा आहे जिथे मुलगा पैसे घेतो. या व्हिडिओवर अनेक यूजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

First published:

Tags: Viral, Viral videos, Wedding, Wedding video