रोम, 26 नोव्हेंबर : उपचाराच्या बऱ्याच पद्धती असतात. औषधांसह काही थेरेपीनेही उपचार केले जातात. अशाच बऱ्याच थेरेपींबाबत तुम्हाला माहिती असेल. पण एका डॉक्टरने तर हद्दच केली. तो चक्क सेक्स करून उपचार करत होता (Doctor claim cure patient with sex). एका स्टिंग ऑपरेशनमध्ये या डॉक्टरचं काळं कृत्य समोर आलं (Doctor physical relation treatment).
इटलीतील स्त्रीरोग तज्ज्ञ (Gynaecologist) डॉ. जियोवानी मिनीलो (Dr. Giovanni Miniello). 60 वर्षांचा हा डॉक्टर मॅजिक फ्लूट नावाने ओळखला जातो. त्याच्याविरोधात एका 33 वर्षीय महिलेने पहिल्यांदाच तक्रार दिली होती. उपचाराच्या नावाने हा डॉक्टर सेक्स करण्यास भाग पाडत असल्याचा आरोप तिने केला होता.
अन्ना मारिया नावाच्या या महिलेने सांगितलं, डॉक्टरने तिला ती प्रेग्नंट होऊ शकत नाही आणि तिला HPV असल्याचं सांगितलं. त्याने अनेक महिलांना कॅन्सरपासून वाचवलं आहे. ज्या महिला रुग्णांनी माझ्यासोबत सेक्स केला, त्यांच्या रिपोर्ट त्यानंतर निगेटिव्ह आला आणि व्हायरस नष्ट झाल्याचा तो म्हणाला.
डॉक्टरने असा सल्ला देताच महिलेने स्थानिक माध्यमांशी संपर्क केला. महिलेच्या तक्रारीनंतर डॉक्टरचा पर्दाफाश करण्यासाठी एका टीव्ही चॅनेलने स्टिंग ऑपरेशन केलं.
हे वाचा - Body Builder ने केलं चक्क बाहुलीशी लग्न; हनीमूनही केला एन्जॉय; पाहा VIDEO
एक प्रोफेशनल अभिनेत्री त्याच्या क्लिनिकमध्ये रुग्ण बनून केली. तिचं चेकअप केल्यानंतर डॉक्टरने तिला HPV असल्याचं सांगितलं. हा लैंगिक संक्रमित व्हायरल आहे, जो कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे तिला योग्य उपचाराची गरज असल्याचंही डॉक्टर म्हणाला. पण प्रत्यक्षात अभिनेत्रीचा टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह होता.
त्यानंतर त्याने तिला उपचाराचा मार्गही सांगितला. त्याच्याजवळ या आजाराचा खात्मा करणारी लस आहे. आपल्याला ही लस देण्यात आली होती. पण महिला त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवेल तेव्हाच ती लस तिच्या शरीरात जाईल. सेक्स करून तो महिलेला सुरक्षित करून शकतो. अभिनेत्रीनेही तयारी दर्शवली.
डॉक्टरने तला एका हॉटेलमध्ये बोलावलं. त्याने अभिनेत्रीला तिचे कपडे काढायला सांगितलं. तसंच जसजसं आपण आपले कपडे काढू तसतशी ती व्हायरसपासून मुक्त होईल असं सांगितलं. अभिनेत्रीने डॉक्टरला कंडोम लावायला सांगितला. त्यावेळी कंडोम लावून सेक्स केला तर व्हायरसशी लढणाऱ्या अँटिबॉडी तिच्या शरीरात जाणार नाही आणि तिला काहीच फायदा होणार नाही, असं त्याने सांगितलं. डॉक्टरने आपले काढायला सुरुवात केली आणि त्यानंतर रिपोर्ट्स तिथे दाखल झाले. रिपोर्ट्सना पाहून डॉक्टरला धक्काच बसला.
हे वाचा - मृत्यूनंतरही पिच्छा सोडत नाहीयेत पुरुष; तरुणीच्या भूताशीही लग्न करण्याची तयारी
मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, वकिलांच्या माध्यमातून डॉक्टराने सांगितलं, मी गेल्या 40 वर्षांच्या करिअरमध्ये शेकडो महिलांवर यशस्वी उपचार केले आहेत. या उपचाराचे चांगले परिणाम आले आहेत. महिलांना आपण कधीच आपल्यासोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडलं नाही. आपण संभोग करून आजार बरे करण्याच्या एका नव्या पद्धतीवर रिसर्च करत आहोत, असा दावा या डॉक्टरने केला होता.
या स्टिंग ऑपरेशननंतर आणखी १५ महिला समोर आल्या ज्यांनी या डॉक्टरवर उपचाराच्या नावाने सेक्स केल्याचा आरोप केला. त्याच्याविरोधात तक्रार केली. डॉक्टरने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आता त्याच्या तपासाचे आदेश देण्यात आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.