बाहुल्यांचा चाहता कजाकिस्तानमधील लोकप्रिय बॉडी बिल्डर युरी तोलोचको यांचं बाहुल्यांवर असणारं प्रेम सर्वश्रूत आहे. काही वर्षांपूर्वी त्याने एका प्लॅस्टिकच्या बाहुलीसोबत लग्न केलं होतं. काही वर्षं तिच्यासोबत संसार केल्यानंतर आपलं एकमेकांशी पटत नसून आपण विभक्त होण्याचा निर्णय़ घेतल्याचं त्यानं जाहीर केलं होतं. त्यानंतर त्याचं लूना नावाच्या एका बाहुलीवर प्रेम जडलं. त्या बाहुलीसोबत नुकताच त्याने विवाह केला आहे. लग्न झाल्यावर हे कपल हनीमूनलादेखील जाऊन आलं. बल्गेरियामध्ये त्यांनी आपला हनीमून साजरा केला. आपल्या पत्नीसोबत आपण संबंधही प्रस्थापित केल्याचं सांगत युरीनं आपल्या फॅन्सचा धक्का दिला आहे. आपल्या हनीमूनचे काही फोटोही त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे वाचा- अनुष्का शर्माने शेअर केले No Makeup फोटो; पती विराट कोहलीने दिली अशी कमेंट ऑफिसच्या कामासाठीही बायको सोबत बल्गेरियाची ट्रीप ही एक कार्यालयीन ट्रीपदेखील होती, अशी माहिती युरीनं दिली आहे. युरी जेव्हा जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जातो, तेव्हा तेव्हा लूना त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसते. वेटरला अनेकदा तिच्या प्लेटमध्ये अन्न वाढायचं की नाही, असा प्रश्न पडतो. मात्र त्या दोघांचं एकमेकांवर असणारं प्रेम पाहून कुणीही युरीला हा प्रश्न विचारत नाही. युरीच्या पत्नीसाठी स्वतंत्र हेअर स्टायलिस्ट आणि ड्रेस डिझायनर आहे. या अनोख्या प्रेमकहाणीची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Couple, Love story, Marriage