मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

15 वर्ष बनावट गर्लफ्रेंडवर खर्च केले कोट्यवधी रुपये, सत्य समजल्यावर बसला शॉक

15 वर्ष बनावट गर्लफ्रेंडवर खर्च केले कोट्यवधी रुपये, सत्य समजल्यावर बसला शॉक

आपल्या ऑनलाईन गर्लफ्रेंडवर 15 वर्षांत कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या फुटबॉलपटूला (Italian football player had 15 year relationship with scammer girlfriend) जेव्हा सत्य समजलं, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

  • Published by:  desk news

इटली, 1 डिसेंबर: आपल्या ऑनलाईन गर्लफ्रेंडवर 15 वर्षांत कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या फुटबॉलपटूला (Italian football player had 15 year relationship with scammer girlfriend) जेव्हा सत्य समजलं, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. प्रत्यक्षात कधीही न भेटता केवळ ऑनलाईन ओळख असलेल्या गर्लफ्रेंडवर हा खेळाडू पैसे खर्च (Spent crores of dollars on girlfriend) करत राहिला, महागड्या भेटवस्तू पाठवत राहिला. अखेर 15 वर्षांनी आपली फसवणूक झाल्याचं समजल्यावर त्याला जबर मानसिक धक्का बसला.

मित्राने करून दिली ओळख

इटलीतील प्रसिद्ध फुटबॉलपटू रॉबर्टो कैजानिगा हा त्याच्या मैदानावरील स्टाईल आणि डावपेचांसाठी जितका प्रसिद्ध आहे, तितकाच तो सध्या ऑनलाईन फ्रॉडचा बळी म्हणूनही चर्चेत आहे. रॉबर्टोचं आर्थिक नुकसान तर झालंच, मात्र त्याला मोठा मानसिक धक्कादेखील गेल्या काही वर्षांत घडलेल्या घटनांमधून बसला आहे. रॉबर्टोच्या एका मैत्रिणीनं त्याची ओळख एका तरुणीसोबत करून दिली. स्वतःचं नाव माया सांगणारी ही तरुणी प्रत्यक्षात रॉबर्टोला कधीच भेटली नाही. मात्र तरीही रॉबर्टो तिच्यावर प्रेम करत राहिला आणि तिच्यावर पैसे खर्च करत राहिला.

सुपरमॉडेलचा चेहरा

माया नावाच्या बनावट व्यक्तीनं ब्राझीलची सुपरमॉडेल एलेसेंड्रा एम्ब्रोसियोचा फोटो स्वतःचा फोटो म्हणून वापरला होता. ऑनलाईन मैत्री झाल्यानंतर काही दिवसांतच मायाने रॉबर्टोला आपण दुर्धर आजाराने ग्रस्त असून ऑपरेशनची गरज असल्याचं सांगितलं. तिच्यावर भाळलेल्या रॉबर्टोनं तिला हवी ती सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं आणि वेळोवेळी तिला पैसे पाठवू लागला. अधूनमधून तो तिला महागडी गिफ्टदेखील पाठवत असे. प्रसिद्ध ब्राझीलियन मॉडेलचा चेहरादेखील हा खेळाडू ओळखू शकला नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

हे वाचा-27 वर्षीय तरुणीला होता बॉयफ्रेंडवर संशय; रागात उचललं असं पाऊल की सगळेच शॉक

खेळाडू झाला कर्जबाजारी

आपल्या गर्लफ्रेंडनं वेगवेगळी कारणं सांगून आपल्याकडून पैसे उकळल्याची तक्रार रॉबर्टोनं पोलिसांत केली आहे. कधी आजाराचं कारण सांगून तर कधी इतर काही गरजा सांगून ती रॉबर्टोकडून पैसे मागत असे. गेल्या 15 वर्षांत त्याने गर्लफ्रेंडवर तब्बल 8 लाख डॉलर म्हणजेच 6 कोटी रुपये खर्च केले. आपल्या गर्लफ्रेंडच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या खेळाडूनं अनेकदा कर्जही घेतलं होतं.

First published:

Tags: Boyfriend, Crime news, Fake, Girlfriend, Italy