मराठी बातम्या /बातम्या /Viral /27 वर्षीय तरुणीला होता बॉयफ्रेंड धोका देत असल्याचा संशय; रागात उचललं असं पाऊल की सगळेच शॉक

27 वर्षीय तरुणीला होता बॉयफ्रेंड धोका देत असल्याचा संशय; रागात उचललं असं पाऊल की सगळेच शॉक

27 वर्षीय एला एमेरी (Ella Emery) आपल्या घरात मृतावस्थेत आढळली (Girlfriend Committed Suicide). या घरात ती आपला बॉयफ्रेंड जॅक फ्रीथ (Jack Freeth) याच्यासोबत राहत असे

27 वर्षीय एला एमेरी (Ella Emery) आपल्या घरात मृतावस्थेत आढळली (Girlfriend Committed Suicide). या घरात ती आपला बॉयफ्रेंड जॅक फ्रीथ (Jack Freeth) याच्यासोबत राहत असे

27 वर्षीय एला एमेरी (Ella Emery) आपल्या घरात मृतावस्थेत आढळली (Girlfriend Committed Suicide). या घरात ती आपला बॉयफ्रेंड जॅक फ्रीथ (Jack Freeth) याच्यासोबत राहत असे

नवी दिल्ली 01 डिसेंबर : नात्यात अनेकदा गैरसमज (Misunderstanding in Relationship) होतात. मात्र, काही कपल है गैरसमज दूर करत आपलं नातं आणखीच घट्ट करताच. मात्र, जेव्हा नात्यात संशय निर्माण होतो तेव्हा हे प्रकरण वेगळ्याच वळणावर पोहोचतं. कितीही खास आणि घट्ट नातं असलं, तरी संशय हे नातं क्षणात संपवतो. असंच काहीसं इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एका कपलसोबत झालं. गर्लफ्रेंडला असं वाटत होतं की तिचा बॉयफ्रेंड तिला धोका देत आहे आणि त्याचे दुसऱ्या मुलींसोबत संबंध आहेत. या संशयामुळे तिनं असं पाऊल उचललं, ज्याबद्दल जाणूनच तुम्ही हैराण व्हाल.

हडर्सफील्डमध्ये (Huddersfield) राहणारी 27 वर्षीय एला एमेरी (Ella Emery) 2019 साली आपल्या घरात मृतावस्थेत आढळली (Girlfriend Committed Suicide). या घरात ती आपला बॉयफ्रेंड जॅक फ्रीथ (Jack Freeth) याच्यासोबत राहत असे. जॅक हिटिंग इंजिनिअर होता. एला ईटन स्मिथ नावाच्या वकिलासोबत काम करायची आणि पार्ट-टाईम आयलॅश टेक्निशियनची नोकरीही करत असे.

डेली स्टारच्या वृत्तानुसार, एलाला असं वाटत असे की तिचा बॉयफ्रेंड इतर मुलींसोबत बोलतो. दोघांमध्ये त्यावेळी भयंकर भांडण झालं जेव्हा जॅक आपल्या मित्रांसोबत ड्रिंक पिण्यासाठी गेला. एलाला असं वाटत होतं की त्याने आपल्या घरात राहावं, जे दोघांनी विकत घेतलं आहे. एलाच्या मृत्यूच्या एक दिवस आधी जॅक आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एका पबमध्ये गेला होता. यावेळी त्याचे इतरही काही मित्र सोबत होते.

एला घरीच होती मात्र तिला असा संशय होता (Girlfriend Suspicious of Boyfriend) की या पार्टीमध्ये केवळ मुलंच नसतील तर मुलीही सहभागी झाल्या असतील. जॅक रात्री घरी परतला तेव्हा एलाने त्याचा फोन चेक केला आणि दुसऱ्या मुलींसोबतचं त्याचं पर्सनल कनेक्शन तपासण्यासाठी जॅकच्या नावाने त्यांना मेसेज केले. मात्र जॅक एलावर खूप प्रेम करायचा. त्यामुळे त्याने कधीही दुसऱ्या मुलींचा विचार केला नाही.

जॅकला संशयातून अटकही करण्यात आली मात्र त्याच्याविरोधात काहीच पुरावा न मिळाल्याने त्याला सोडून देण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या पहिल्या रिलेशनशिपवेळीही एलाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ती आपल्या कुटुंबीयांची भरपूर काळजी करत असे त्यामुळे नेहमी चिंतेत राहात असे. याच कारणामुळे ती फ्रस्ट्रेट झाली होती.

First published:
top videos

    Tags: Relationship, Suicide news