जगातील जवळपास 146 देश कोरोनाव्हायरसशी लढत आहेत. विशेष म्हणजे अमेरिका, इटली, स्पेन, फ्रान्स आणि यूकेसारख्या देशांमध्ये व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण सर्वात जास्त आहे. आश्चर्य म्हणजे या देशांमध्ये जगातील सर्वात उत्तम असं हेल्थ केअर सिस्टम आहे. तरीही कोरोनाव्हायरसशी लढ्यात या देशांना फारसं यश मिळत नाहीये.
भारत वेगवेगळे ट्रायल करण्यात आले. कोरोनाग्रस्तांवर अँटीमलेरिया, अँटी स्वाईन फ्लू आणि अँटी एचआयव्ही औषधांची चाचणी करण्.ात आली, ज्याचे सुरुवातीचे परिणाम सकारात्मक होते. शिवाय 23 मार्चलाही सरकारने उपचारासाठी हायड्रोक्सिक्लोरोक्विन औषधाचा गंभीर रुग्ण आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी वापरण्याची परवनागी दिली.