लसीच्या आशेवर राहू नका, कोरोनाच्या दहशतीत जगावं लागेल; WHO ने केलं सावध

लसीच्या आशेवर राहू नका, कोरोनाच्या दहशतीत जगावं लागेल; WHO ने केलं सावध

कोरोनाव्हायरसविरोधात लसीची (Coronavirus Vaccine) प्रतीक्षा प्रत्येकाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 एप्रिल : कोरोनाव्हायरविरोधात (Coronavirus) लस (vaccine) आणि औषधासाठी जगभरातील शास्त्रज्ञ जुटलेत. ही लस कधी येईल याची प्रतीक्षा प्रत्येकाला आहे. मात्र कोरोनाव्हायरसच्या लस येईलच याची अपेक्षा ठेवू नका,कोरोनाच्या दहशतीत जगावं लागेल, असं म्हणत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सावध केलं आहे.

कोविड-19 साठी जागतिक आरोग्य संघटनेचे दूत आणि लंडनच्या इम्पेरिअल कॉलेजमधील ग्लोबल हेल्थचे प्राध्यापक डेव्हिड नॅबारो (David Nabarro) यांनी असा इशारा दिला आहे. द गार्डियनने याबाबत वृत्त दिलं आहे.

हे वाचा - लॉकडाऊनमुळे मुलांमध्ये वाढतोय स्ट्रेस, पालकांनो अशी घ्या मुलांची काळजी

डेव्हिड नॅबारो म्हणाले, "कोरोनाविरोधात यशस्वी लस तयार होईलच असं नाही, त्यामुळे कोरोनाव्हायरसच्या दहशतीतच जगावं लागेल. प्रत्येक व्हायरसविरोधात एक सुरक्षित आणि प्रभावी अशी लस तयार करू शकत नाही. काही व्हायरस असे असतात, ज्यांच्याविरोधात लस तयार करणं कठिण असतं. त्यामुळे कोरोनाव्हायरसविरोधात लस निश्चित आणि लवकर बनेल या आशेवर राहू नका. व्हायरसच्या धोक्यात आपलं आयुष्य जगण्याचा नवा मार्ग शोधावा लागेल. नव्या परिस्थितीशी माणसांना जुळवून घ्यावं लागेल"

"याचा अर्थ कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसणाऱ्या आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना आयसोलेट करावं लागेल. वयस्कर व्यक्तीचं संरक्षण करावं लागेल. शिवाय कोरोनाव्हायरसवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांची क्षमताही वाढवावी लागेल. आपणा सर्वांसाठी हे एक न्यू नॉर्मल असेल", असं ते म्हणाले.

हे वाचा - गजानन महाराजांनी स्वप्नात सांगितलं कोरोनाचं औषध, गोव्यातल्या शिक्षकाचा दावा

याशिवाय याआधीदेखील जागतिक आरोग्य संघटनेच्या एमर्जिंग डिसीजच्या प्रमुख मारिया व्हॅन केरखोवे म्हणाल्या होत्या की, "कोरोनाव्हायरसमुळे एकदा संक्रमित झालेली व्यक्तीमध्ये व्हायरसविरोधात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते किंवा तिला या व्हायरसची लागण पुन्हा होत नाही, याबाबत ठोस पुरावे नाहीत"

संपादन, संकलन - प्रिया लाड

First published: April 19, 2020, 6:25 PM IST

ताज्या बातम्या