जेरुसलेम, 19 जानेवारी: पेगॅसिस (Pegasus) या वादग्रस्त स्पायवेअरचा (Spyware) वापर स्वतःच्याच देशातील नागरिकांविरोधात (Against own citizens) केल्याचा आरोप इस्त्रायलच्या पोलिसांवर (Israel Police) सध्या करण्यात येत आहे. इस्त्रायलच्या संसदेनं हा गंभीर आरोप केला असून पोलिसांना आपलं निर्दोषत्व सिद्ध करावं लागणार आहे. सरकारविरोधी आंदोलनांच्या वेळी पोलिसांनी आंदोलक नेत्यांवर पाळत ठेवण्यासाठी या स्पायवेअरचा वापर केल्याचा दावा करण्यात आला आहे. काय आहे प्रकरण? पेगॅसिस हे इस्त्रायलच्या NSO ग्रुपकडून तयार करण्यात येणारं एक स्पायवेअर आहे. हे स्पायवेअर कंपनीकडून अनेक देशांना विकलं जातं. त्या त्या देशातील गुप्तचर यंत्रणा अतिरेक्यांवर आणि देशविघातक शक्तींवर लक्ष ठेवण्यासाठी या स्पायवेअरचा वापर करत असतात. मात्र इस्रायलच्या पोलिसांनी या स्पायवेेअरचा वापर आपल्याच देशतील नागरिकांवर पाळत ठेवण्यासाठी केल्याची बाब काही पुराव्यांमधून समोर आली आहे. या मुद्द्यावरून सध्या संसदेत गदारोळ उडाला असून प्रकरणाची सखोल चौकशी कऱण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्पायवेअरचा कशासाठी वापर? पेगॅसिस स्पायवेअरची सेवा पोलिसांनी घेतली होती, मात्र त्याचा वापर करण्यात आला की नाही, याबाबत सध्या ठोपणे काहीच सांगू शकत नसल्याची प्रतिक्रिया जेरुसलेमचे पोलीस महासंचालक खोबी शब्ताई यांनी दिली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे संशय अधिक बळावला असून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. सध्या भ्रष्टाचाराचे आरोप होत असलेले माजी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यामुळे चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता आहे. हे वाचा -
काय आहे प्रकरण? माजी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू पंतप्रधानपदी असताना सरकारविरोधात इस्त्रायलमध्ये आंदोलन होत होतं. त्यांनी पदावरून पायउतार व्हावं या मागणीसह इतर अनेक मागण्यांसाठी ‘ब्लॅक फ्लॅग’ आंदोलनानं जोर धरला होता. त्या काळातच या स्पायवेअरचा वापर झाला आणि या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांच्या मोबाईलमध्ये हे स्पायवेअर टाकून त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली, असा आरोप संसदेनं केला आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.