खूशखबर! आता 90 दिवसांत कोरोनावर लस मिळणार, 'या' देशाने केला दावा

खूशखबर! आता 90 दिवसांत कोरोनावर लस मिळणार, 'या' देशाने केला दावा

कोरोानावर लस तयार करण्यासाठी सुमारे 50 देशांमध्ये संशोधन चालू आहे. दरम्यान, इस्रायलने कोरोना विषाणूची लस तयार केली आहे.

  • Share this:

जेरुसलेम, 13 एप्रिल : कोरोनाव्हायरसने चीनमधून चार महिन्यांपूर्वी जगात प्रवेश केला. या धोकादायक विषाणूमुळे आतापर्यंत एक लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 18 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र अद्याप कोणत्याही देशाला या विषाणूवर लस शोधता आलेली नाही. लस तयार करण्यासाठी सुमारे 50 देशांमध्ये संशोधन चालू आहे. दरम्यान, इस्रायलने कोरोना विषाणूची लस तयार केली आहे. येत्या 90 दिवसांत कोरोनाशी लढा देण्यासाठी त्यांचे वैज्ञानिक लस पूर्णपणे तयार करतील असा दावा त्यांनी केला आहे.

90 दिवसांत तयार करणार लस

इस्त्रायलमधील टेलीग्राम चॅनेलने दिलेल्या वृत्तानुसार, 90 दिवसात ही लस तयार होणार आहे. येथील विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार ओफिर अकुनिस यांनी दावा केला आहे की, कोरोना दूर करण्यासाठी 90 दिवसांच्या आत लस तयार करेल. त्यांच्या मते ही एक अतिशय अनोखी आणि प्रभावी लस आहे. मिगेल गॅलेली रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इस्त्रायलच्या शास्त्रज्ञांचेही मंत्री यांनी अभिनंदन केले. लवकरच ही लस वापरली जाईल आणि नंतर ती इतर देशांना दिली जाईल.

वाचा-अमेरिकेतून भारतात येतोय कोरोना? न्यूयॉर्कमध्ये मृतांचा आकडा झाला कमी पण...

अशाप्रकारे लस तयार केली जात आहे

कोरोना विषाणूसारखा आणखी एक आजार इस्त्रायलमध्ये कोंबड्यांमध्ये पसरला आहे. याचा सामना करण्यासाठी येथील संशोधन संस्थेने एक लस तयार केली आहे. गेल्या चार वर्षांत बनविलेली ही एक अतिशय प्रभावी लस आहे. याचा लसीचा वापर करून त्यांनी कोव्हिड-19विरूद्ध लस तयार केली. या संशोधन गटाचे प्रमुख डॉ. कार्ट्झ म्हणाले की, 'हा अभ्यास आम्ही खूप आधीपासून सुरू केला आहे. आम्ही आमच्या सिस्टमसाठी कोरोनो व्हायरसची मॉडेल म्हणून निवडण्याचे ठरविले आणि हे अशाप्रकारे वापरले जाऊ शकते हे समजले नाही.

वाचा-कोरोनाला रोखण्यासाठी परदेशी मीडियाकडून केरळचं केलं जातंय कौतुक

ब्रिटनमध्ये 5 महिन्यात तयार केली जाणार लस

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीकरणशास्त्र विभागाच्या प्रोफेसर सारा गिलबर्ट यांनी दावा केला आहे की, तिची टीम लवकरच कोरोना विषाणूची लस तयार करेल. सारा यांनी येत्या 15 दिवसांत कोरोना विषाणूची लस चाचणी करणार असल्याचे सांगितले. या लसीबाबत सारा यांना 80 टक्के विश्वास आहे. या चाचणीचा निकाल चांगला आल्यात सरकार यासाठी निश्चितपणे निधी जाहीर करेल, याचीही चिन्हे असल्याचा विश्वास सारा यांनी व्यक्त केला. याआधी अमेरिकेने मानवावर लसीची चाचणी केली होती. मात्र अद्याप या लसीबाबत अधिक माहिती मिळालेली नाही. त्यामुळे अमेरिकेआधी ब्रिटनमध्ये ही लस तयार केली जाऊ शकते.

वाचा-अर्ध्या भारताला कोरोनाने वेढलं, रुग्णांची संख्या 8,400 वर तर 273 जणांचा मृत्यू

संकलन, संपादन-प्रियांका गावडे

First published: April 13, 2020, 9:09 AM IST

ताज्या बातम्या