मराठी बातम्या /बातम्या /विदेश /ISI आणि ISKP ची छुपी युती, पाकिस्तानकडून तालिबानच्याही पाठीत खंजीर; वाढली काश्मीरची चिंता

ISI आणि ISKP ची छुपी युती, पाकिस्तानकडून तालिबानच्याही पाठीत खंजीर; वाढली काश्मीरची चिंता

अफगाणिस्तानमधील (Afghanistan) तालिबान (Taliban government) सरकारच्या कामकाजात हस्तक्षेप करणाऱ्या पाकिस्ताननं (Pakistan) आता ISKP (Islamic State Khurasan Province)  या दहशतवादी संघटनेशी संधान साधल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

काबुल, 14 सप्टेंबर : अफगाणिस्तानमधील (Afghanistan) तालिबान (Taliban government) सरकारच्या कामकाजात हस्तक्षेप करणाऱ्या पाकिस्ताननं (Pakistan) आता ISKP (Islamic State Khurasan Province)  या दहशतवादी संघटनेशी संधान साधल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तालिबानने पाकिस्तानला सहकार्य करायला नकार दिल्यानंतर तालिबानची शत्रू मानल्या जाणाऱ्या या संघटनेसोबत पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयने हातमिळवणी केल्याची माहिती आहे.

अफगाणिस्तानचा शत्रू, पाकिस्तानचा मित्र

वास्तविक, तालिबानने अफगाणिस्तानातील सत्ता मिळवल्यानंतर बॉम्बस्फोट करून खळबळ उडवून देणाऱ्या ISKP या संघटनेशी पाकिस्ताननं जवळीक साधली आहे. तालिबान आणि ISKP या संघटना एकमेकींच्या कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. अफगाणिस्तानमधील काबुल विमानतळावर बॉम्बस्फोट करून नरसंहार घडवणाऱ्या ISKP ला धडा शिकवण्यासाठी तालिबान योजना आखत आहे. अशा परिस्थितीत तालिबानचे मित्रराष्ट्र असणाऱ्या पाकिस्तानने ISKP शी हातमिळवणी केल्यामुळे तालिबानलाही धोका दिल्याची चर्चा आहे.

काश्मीरमधील डोकेदुखी वाढणार

पाकिस्तान आणि ISKP या संघटनांचे एकमेकांशी चांगले संबंध आहे. अल कायदाने जेव्हा ISKPच्या तत्कालीन प्रमुख जिया उल हकची हत्या केली होती, त्यावेळी पाकिस्तानने या संघटनेतील अनेकांना त्यांच्या देशात आसरा दिला होता. त्याची परतफेड म्हणून आता ISKP च्या मदतीनं काश्मीरमधील कारवाया वाढवण्याचा पाकिस्तानचा डाव आहे.

हे वाचा - उपचारासाठी गेलेल्या महिलेचा डॉक्टरने केला विनयभंग, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

काश्मीरसाठी सर्व काही

काश्मीरमध्ये सध्या स्थानिक पोलिसांनी आणि सैन्याचं परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं असून तुरळक घटना वगळता हा परिसर शांत आहे. तिथे पर्यटनालाही सुरुवात झाली असून पाकिस्तानी दहशतवादी संघटना हतबल झाल्या आहेत. पाकिस्तानपुरस्कृत संघटनांकडील आर्थिक ताकद संपल्यामुळे प्रत्यक्ष घुसखोरी करण्यासाठी आवश्यक शस्त्रास्त्रं नसल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रत्यक्ष घुसखोरीऐवजी ड्रोन हल्ल्यांचं प्रमाण वाढल्याचं चित्र दिसत होतं. मात्र ड्रोन हल्लेदेखील भारतानं हाणून पाडल्यामुळे पाकिस्तानमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. त्यातूनच ISKP संघटनेला सोबत घेऊन पुन्हा काश्मीर अशांत करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

First published:
top videos

    Tags: Afghanistan, ISIS, Pakistan, Taliban