मराठी बातम्या /बातम्या /nashik /धक्कादायक ! उपचारासाठी क्लिनिकमध्ये गेलेल्या महिलेचा विनयभंग, आरोपी डॉक्टरच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

धक्कादायक ! उपचारासाठी क्लिनिकमध्ये गेलेल्या महिलेचा विनयभंग, आरोपी डॉक्टरच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

महिलांवर अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत. आता नाशकात एका डॉक्टरने महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.

महिलांवर अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत. आता नाशकात एका डॉक्टरने महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.

महिलांवर अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत. आता नाशकात एका डॉक्टरने महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी

नाशिक, 14 सप्टेंबर : राज्यात महिला अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत. मुंबईतील साकीनाका येथे घडलेल्या निर्भया प्रकरण ताजे असतानाच आता नाशकातून (Nashik) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपचारासाठी गेलेल्या एका महिलेचा डॉक्टरांनीच विनयभंग (Woman molested by Doctor) केल्याची घटना नाशकातून समोर आली आहे.

नाशिकच्या पंचवटी परिसरात राहणाऱ्या सदर महिलेची चीड चीड होत होती. त्यावर उपाय म्हणून शहरातील पाथरवट लेन येथील संमोहन तज्ञ या डॉक्टरांकडे उपचारासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी सदर महिलेचा मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून उपचार घेण्यासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग केला. त्यामुळे महिलेच्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलिसांनी संशयित संमोहन तज्ञ दीपक मुठाळ यांना अटक केली असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोल्हे यांनी दिली आहे.

अखेर राज ठाकरेंचा 'हा' मुद्दा पटला अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वपूर्ण निर्देश

अत्याचारातील नराधमांना वचक बसवा - मुख्यमंत्री

माता-भगिनींची टिंगल-टवाळी खपवून घेतली जाणार नाही, हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलो आहोत. त्यामुळे त्या सुरक्षित राहिल्याच पाहिजेत, यासाठी जे काही करता येईल, अशा उपाययोजनांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, त्यासाठी पूर्ण पाठबळ देण्यात येईल. यातून महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना वचक बसावा यासाठी जो काही संदेश द्यावा लागेल, त्यासाठी प्रयत्न करा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

शक्ती कायदा संयुक्त समितीचा अहवाल आगामी अधिवेशनात

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले की, अलीकडच्या काळात राज्यात घडलेल्या घटनामुळे पोलीसांचा वचक आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे. ही बाब पोलीस दलाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी पोलीस दलाने अधिक दक्ष व सतर्क राहणे आवश्यक आहे. कोरोना काळात पोलीस यंत्रणावर विशेष ताण आहे हे लक्षात घेतले तरी यंत्रणांनी अधिक सतर्क व कार्य तत्पर रहावे. पोलीस स्थानकात आलेल्या महिलेची तक्रार तत्काळ नोंदवून घेण्यात यावी. या तक्रारीचा तपास, पुरावे जमा करण्यास प्राधान्य द्यावे. अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात दोषारोपपत्र लवकरात लवकर दाखल करावे. अशा न्यायालयीन प्रकरणांना गती देण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा. महाराष्ट्र पोलीस दल नावारुपाला आलेले दल आहे. हे नाव राखण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे, असेही त्यांनी सांगितले.

जलदगती न्यायालयांच्या माध्यमातून प्रकरणांचा निकाल लवकरात लवकर लागावा, तसेच त्यामध्ये शिक्षा होईल, याबाबतही प्रय़त्न करावेत. शक्ती कायद्याचे प्रारूप विधानसभेत मांडण्यात आले आहेत. कायदा परिपूर्ण होण्यासाठी विधीमंडळाची संयुक्त समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात येत आहेत. या समितीचा अहवाल आगामी हिवाळी अधिवेशनात सादर करणार असल्याचेही गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले.

First published:
top videos

    Tags: Crime, Nashik