मराठी बातम्या /बातम्या /देश /इमारतीचं खोदकाम सुरू असताना आढळली 11 फूट मगर; परिसरात खळबळ

इमारतीचं खोदकाम सुरू असताना आढळली 11 फूट मगर; परिसरात खळबळ

इमारतीच्या बांधकामाचं खोदकाम सुरू असताना 11 फूट मोठी मगर  (Crocodile) दिसल्याने परिसराळात खळबळ उडाली आहे. त्यामुळे बराच काळ काम ठप्प कराव लागलं आहे.

इमारतीच्या बांधकामाचं खोदकाम सुरू असताना 11 फूट मोठी मगर (Crocodile) दिसल्याने परिसराळात खळबळ उडाली आहे. त्यामुळे बराच काळ काम ठप्प कराव लागलं आहे.

इमारतीच्या बांधकामाचं खोदकाम सुरू असताना 11 फूट मोठी मगर (Crocodile) दिसल्याने परिसराळात खळबळ उडाली आहे. त्यामुळे बराच काळ काम ठप्प कराव लागलं आहे.

वडोदरा, 01 मार्च: इमारतीचं बांधकाम करण्यासाठी खोदकाम करत असताना अचानक 11 फूट मोठी मगर  (Crocodile) दिसल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही 10 ते 11 फूट लांब असणारी हिंस्त्र मगर मानवी वस्तीत आली कशी? याबद्दल बरीच सुरू आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, संबंधित इमारतचं खोदकाम करत असताना अचानक मगर आढळली आहे. ही मगर सर्वप्रथम कामगारांनी पाहिली. त्यानंतर काही काळ काम ठप्प करण्यात आलं होतं. पण वन्यजीव संरक्षण संस्थेच्या काही कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन संबंधित मगरीचं सुरक्षित रेस्क्यु केलं आहे. त्यानंतर मगरीला सुरक्षित ठिकाणी सोडून देण्यात आलं आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, बांधकाम क्षेत्रात शिरलेल्या मगरीला पकडण्यासाठी इमारतीच्या बिल्डरने बचाव चमूशी संपर्क साधला होता. यानंतर वन्यजीव संरक्षण संस्थेचे अरविंद पवार यांची टीम घेवून त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मगरीला कोणतीही इजा न करता पकडण्यात आलं असून तिला वनविभागाच्या स्वाधीन केलं आहे. यावेळी वनविभागाचे डॉक्टरही घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी मगरीची तपासणी केली आणि मगर पूर्णपणे स्वस्थ असल्याचं सांगितलं.

पावसाळ्यात सर्वात जास्त मगरी वडोदरामध्ये पकडल्या

गुजरातमधील वडोदरा शहर व त्या परिसरातून वाहणाऱ्या विश्वामित्री आणि धाधहर नद्यांजवळील मानवी वस्त्यांमध्ये मगरी सापडणं आता सामान्य बाब झाली आहे. काही महिन्यांपूर्वी या भागात पूर आला होता तेव्हा येथून तब्बल 76 मगरी पकडल्या होत्या.

हे ही वाचा -VIDEO : पेट्रोल खरेदीसाठी तरुण पोहचला पंपावर; परतला तेव्हा अंगावर कपडेही नव्हते

पावसाच्या पाण्याने किंवा नदीतील पाणी कमी झाल्यामुळे मगरी मानवी वस्त्यांमध्ये प्रवेश करतात. येथे सहसा चार ते पाच फूट मगरी अनेकदा आढळल्या आहेत. ज्या सहज पकडल्याही जातात. या परिसरात पशू कल्याण संस्था देखील सक्रिय आहे. तसेच त्यांच्याकडे मगरी पकडणारे तज्ज्ञ देखली आहेत. स्थानिक लोकांनी सांगितलं की, पावसाळा आणि पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे देशातील सर्वात जास्त मगरी वडोदरा आणि आसपासच्या परिसरात पकडल्या जातात. मानवी वस्त्यांमध्ये शिरलेल्या मगरींनी अनेकदा गावातील कुत्र्यांना आणि गायींना गंभीररित्या जखमी केलं आहे.

First published:

Tags: Crocodile, Gujrat, Rescue operation