Home /News /videsh /

चीनच्या निरोगी रुग्णांमध्ये 70 दिवसांनी दिसली वेगळीच लक्षणं, वैज्ञानिकांची चिंता वाढली

चीनच्या निरोगी रुग्णांमध्ये 70 दिवसांनी दिसली वेगळीच लक्षणं, वैज्ञानिकांची चिंता वाढली

चीनमध्ये लॉकडाऊन हटवल्यानंतर नवनवीन समस्या समोर येत आहेत. आता पुन्हा निरोगी रुग्णांना कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली आहे.

    बीजिंग, 23 एप्रिल : जगभरात कोरोनाव्हायरसने सध्या थैमान घातले आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये कोरोना प्रसार वेगानं होत आहे. तर, चीन चीनमधील कोरोना प्रकरणे गेल्या अनेक दिवसांपासून कमी होत आहेत. मात्र आता कोरोनाचे नवीन रूप पाहून लोक घाबरले आहेत. म्हणूनच, येथे रुग्णांना मानसिकदृष्ट्या बळकट होण्यास मदत करण्यासाठी मानसशास्त्रीय सल्लागाराचीही मदत दिली जात आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, निरोगी रूग्णांमध्ये 2 महिन्यांनंतरही पुन्हा कोरोनाची लक्षणं दिसत आहे. मात्र ही लक्षणं काहीशी वेगळी आहेत. वुहानमधील एक डॉक्टर म्हणतात की चीनमध्ये अशी प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत जिथे कोरोना विषाणूपासून बरे झाल्यानंतरही लोकांची चाचणी पॉझिटिव्ह येत आहे. डॉक्टर म्हणतात की, अशी प्रकरणे त्यांच्यासाठी मोठे आव्हान आहे कारण देश कोरोनाच्या नव्या रूपात लढा देत आहे. डॉक्टरांनी सांगितले की ज्या रूग्णांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत, त्यांना काही दिवसांनी कोरोनाची लागण होत आहे. यातील काही रुग्ण 50-60 तर काही 70 दिवसांनी पॉझिटिव्ह येत आहेत. वाचा-चीनमध्ये कोरोना Return; वुहाननंतर हार्बिनला धोका, सरकारकडून शहर सील कोरोनाची वारंवार होणारी लागण ही सध्या जगासमोर चिंतेचा विषय आहे. एकीकडे बरेच देश लॉकडाऊन हटवण्याच्या तयारीत आहेत. मात्र या नवीन चिंतेमुळे वैज्ञानिक त्रस्त आहेत. दरम्यान, चीनने अद्याप अशा प्रकारच्या रुग्णांच्या श्रेणीची अचूक आकडेवारी जाहीर केलेली नाही, परंतु चीनमधील काही रुग्णालयांनी रॉयटर्सला सांगितले की अशा प्रकारच्या किमान डझनभर प्रकरणे नोंदवली गेली आहेत. वुहानमधील झोंगानन हॉस्पिटलचे उपाध्यक्ष युआन युफेंग यांनी रॉयटर्सला सांगितले की, एका घटनेची माहिती आहे ज्यामध्ये सुमारे 70 दिवसांपूर्वी विषाणूचा शोध लागल्यानंतरही रुग्णाची तपासणी चालू होती. युआन युफेंग म्हणाले, SARC रोगाच्या वेळीसुद्धा आम्ही असे काहीही पाहिले नव्हते'. दरम्यान, दोन चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर चीनमध्ये रुग्णांना डिस्चार्ज दिला जातो. मात्र काही वेळा 48 तासांनी कोरोनाची लक्षणे दिसतात. त्यामुळं आता चाचण्यांची संख्या दोन वरून तीन किंवा त्याहून अधिक करावी अशी काही डॉक्टरांची मागणी आहे. वाचा-लॉकडाऊननंतर चीनचे नवे उपद्व्याप! सुरू केली किसिंग स्पर्धा, PHOTO VIRAL वुहाननंतर हार्बिन शहराला कोरोनाचा धोका चीनमधील वुहान शहरातील 76 दिवसांच्या लॉकडाऊनंतर लोक आणि तिथली कामाची, अर्थव्यवस्थेची घडी आता कुठे नीट होत आहे. तर दुसरीकडे पुन्हा एकदा कोरोनाचं संकट डोकं वर काढत असल्याचा पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे उत्तर पूर्वेकडील हार्बिन शहर हे कोरोनाचं केंद्र होत असल्याचं लक्षात आलं आहे.एका अहवालानुसार मागच्या आठवड्यात 87 वर्षांच्या कोरोनाग्रस्तामुळे 35 लोकांना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. हार्बिन शहरात मोठ्या प्रमाणात लोक राहतात. सध्या इथल्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी असली तरीही कोरोना वेगानं पसरण्याचा धोका आहेच. हीलॉन्गजियांग भागात 537 रुग्ण कोरोनाग्रस्त आढळले आहेत. त्यापैकी 384 रुग्ण हे बाहेरून आले असल्याचा दावा चीन सरकारनं केला आहे. संपादन, संकलन-प्रियांका गावडे
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या