Home /News /videsh /

काबुल विमानतळावर सुरक्षेची ऐशीतैशी, अडकलेल्या भारतीयांना विमानासाठी करावी लागणार मोठी प्रतीक्षा

काबुल विमानतळावर सुरक्षेची ऐशीतैशी, अडकलेल्या भारतीयांना विमानासाठी करावी लागणार मोठी प्रतीक्षा

काबुलमध्ये विमान उतरवण्यासाठी सध्या सुरक्षित वातावरण नसल्यामुळे अफगाणिस्तानमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना (Indians) पुढील विमानासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.

    काबुल, 30 ऑगस्ट : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबाननं (Taliban) सत्ता स्थापन केल्यानंतर आता पुढील काही तासांत अमेरिका (America) आपलं पूर्ण सैन्य माघारी बोलावणार आहे. सध्या काबुलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Kabul International Airport) होणारे दहशतवादी हल्ले (terror attacks) आणि त्याला अमेरिकेकडून दिलं जाणारं प्रत्युत्तर यामुळे विमानतळाच्या सुरक्षेची (security) ऐशीतैशी झाल्याचं चित्र दिसत आहे. काबुलमध्ये विमान उतरवण्यासाठी सध्या सुरक्षित वातावरण नसल्यामुळे अफगाणिस्तानमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना (Indians) पुढील विमानासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. आतापर्यंत परतले 550 नागरिक अफगाणिस्तानमध्ये तालिबाननं सत्ता स्थापन केल्यानंतर म्हणजेच 15 ऑगस्टनंतर आतापर्यंत सुमारे 550 नागरिक अफगाणिस्तानमधून भारतात आले आहेत. यातील 260 भारतीय नागरिक आहेत. तर उरलेले सर्व शरणार्थी आहेत. मात्र अजूनही काही भारतीय अफगाणिस्तानात अडकले असून त्यांच्या सुखरूप सुटकेसाठी सरकार प्रयत्नशील आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानमध्ये सध्या 20 भारतीय नागरिक अडकून पडले असून सुटकेसाठी विमानाची प्रतीक्षा करत आहेत. तर 140 पेक्षा अधिक शिख आणि हिंदू नागरिक भारताकडे शरण मागत आहेत. या सर्वांना भारतात सोडण्यास तालिबानने नकार दिला होता. या सर्वांचे पासपोर्ट आणि व्हिसा यांची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतरच त्यांना सोडण्याचा निर्णय़ घेण्यात येईल, असं तालिबाननं म्हटलं होतं. हे वाचा - बायकोच्या त्रासापासून हवी होती सुटका, पोलीस स्टेशनला आग लावून गेला तुरुंगात विमानतळाची सुरक्षा टर्की किंवा कतारकडे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 31 ऑगस्टला अमेरिकेने काबुल विमानतळाचा ताबा सोडल्यानंतर आता या विमानतळाच्या सुरक्षेची आणि व्यवस्थापनाची जबाबदारी टर्की किंवा कतार या दोनपैकी एका देशाकडे सोपवली जाणार असल्याची माहिती आहे. तालिबानकडे सध्या विमानतळ व्यवस्थापन आणि सुरक्षेची व्यवस्था नसून हे विमानतळ इतर देशांना चालवायला दिलं जाणार आहे. त्यानंतरच अडकलेल्या भारतीयांची अफगाणिस्तानमधून सुटका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तोपर्यंत मात्र त्यांना तिथेच राहावं लागण्याची शक्यता आहे. अमेरिकेने पूर्ण माघार घेतल्यानंतर आता किती दिवसांत काबुल विमानतळावरील स्थिती पूर्ववत होते, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Afghanistan, Airport, Kabul, Taliban

    पुढील बातम्या