जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / बायकोच्या त्रासापासून हवी होती सुटका, पोलीस स्टेशनला आग लावून गेला तुरुंगात

बायकोच्या त्रासापासून हवी होती सुटका, पोलीस स्टेशनला आग लावून गेला तुरुंगात

बायकोच्या त्रासापासून हवी होती सुटका, पोलीस स्टेशनला आग लावून गेला तुरुंगात

रोज रोज बायकोकडून (wife) होणाऱ्या छळाला कंटाळलेल्या पतीला (Husband) काहीही करून तुरुंगात (Jail) जाण्याची इच्छा होती. त्यासाठी त्याने चक्क पोलीस स्टेशनलाच (Police station) आग (Fire) लावली.

  • -MIN READ
  • Last Updated :

गांधीग्राम, 30 ऑगस्ट : रोज रोज बायकोकडून (wife) होणाऱ्या छळाला कंटाळलेल्या पतीला (Husband) काहीही करून तुरुंगात (Jail) जाण्याची इच्छा होती. त्यासाठी त्याने चक्क पोलीस स्टेशनलाच (Police station) आग (Fire) लावली. सततची गरीबी, कर्जबाजारीपणा आणि त्यात बायकोकडून होणारा छळ याला कंटाळलेला पती काहीही करुन तुरुंगात जाण्याच्या मनस्थितीत होता. त्यासाठी काय करावे, याचा बराच दिवस तो विचार करत होता. अखेर त्याने पोलीस स्टेशनलाच आग लावली. असा घेतला निर्णय ही घटना आहे गुजरातमधल्या गांधीग्राममधील. देवजी उर्फ देव चावडा हा इसम घरच्या कटकटींना वैतागला होता. दुसऱ्या लॉकडाऊनच्या काळापासून तो आर्थिक संकटात होता. आर्थिक विवंचनेतूनकसं बाहेर पडावं, याचा तो विचार करत होता. मात्र त्याचवेळी त्याला पत्नीकडून होणारा त्रास सहन होत नव्हता. रोजची भांडणं, टोमणे आणि कटकटी यातून सुटका करवून घेण्याचा एकच मार्ग त्याला सुचला. तो म्हणजे तुरुंग. काही तरी करून आपण तुरुंगात गेलो, तर आपल्याला तिथं शांतपणे राहता येईल आणि पुढचा विचार करता येईल, असं त्यानं ठरवलं. लावली पोलीस स्टेशनलाच आग गांधीग्राम परिसरातील बजरंगवाडी पोलीस स्थानकालाच देव चावडाने आग लावली. पोलीस स्टेशनचे पेट घेतला असताना तो तिथेच उभा राहून पेटणारं पोलीस स्टेशन बघत राहिला. काही वेळातच अग्निशमन दलाने ही आग विझवली. देव चावडाने आपणच ही आग लावल्याचं कबूल केलं आणि स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलिसांनी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल केला आहे. हे वाचा - उधारीसाठी आईनंच दुकानदाराच्या हवाली केल्या मुली; बलात्काराचे व्हिडिओ केले शूट पोलीस चौकशी सुरू गांधीग्राम पोलिसांनी देववर सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी भारतीय दंडविधानाच्या कलम 436 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पत्नीला वैतागलेल्या मनोवस्थेत त्याने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे. आता प्रत्यक्ष न्यायालयाकडून देव चावडाला किती शिक्षा सुनावली जाते, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात