न्यूयॉर्क पोस्टला या प्रसंगाची माहिती देताना टोबिन मडाथिल म्हणाला, ‘मी वेळेत ट्रेन थांबवू शकलो आणि त्या माणसाचा जीव वाचवू शकलो याचा मला अतिशय आनंद आहे. माझी ट्रेन स्टेशनमध्ये शिरत असतानाच लोक माझ्याकडे बघून हातवारे करत होते. ते बघून मी तातडीनं ट्रेन इमर्जन्सी मोडमध्ये टाकली आणि ती वेळेत थांबली. ट्रेन थांबल्यावर मी ट्रॅकवर पडलेल्या व्यक्तीकडे गेलो आणि बघितलं तर त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होतं. लोकांच्या मदतीनं मी त्याला प्लॅटफॉर्मवर आणलं. लोक सतर्क असल्यानं त्यांनी वेळेत मला इशारा केल्यानं हे घडलं.’ हेही वाचा- “हॅलो, मी नरेंद्र मोदी बोलतोय”;तुम्ही कसे आहात? त्या जखमी व्यक्तीला माउंट सिनाई मेडिकल सेंटरमध्ये नेण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेबाबत अधिक माहिती देताना स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ही 35 वर्षीय व्यक्ती दक्षिणेकडील प्लॅटफॉर्मवर उभी असताना तिच्या पाठीमागं असलेल्या एका अज्ञात व्यक्तीनं काही तरी बडबडत तिला ढकलून दिलं. न्यूयॉर्क पोलीस विभाग (NYPD) त्या अज्ञात गुन्हेगाराचा शोध घेत असून, तो साधारण 20 ते 30 वर्षे वयाची 6 फूट उंच व्यक्ती असून, हल्ल्याच्या दिवशी मास्कसह तिनं हूडी, पँट आणि शूजसह संपूर्ण काळ्या रंगाचा पोशाख घातला होता, अशी माहिती समोर आली आहे. द्वेषविरोधी गुन्हे कृती दलानंही (Anti Hate Task Force) लोकांना या गुन्हेगाराला शोधण्यासाठी मदतीचं आवाहन केलं आहे. ट्विटरवर त्याचा फोटो प्रसारित करत तिला पकडून देणाऱ्यास 3500 डॉलर्सचं बक्षीस जाहीर केलं आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सर्व ते प्रयत्न करण्यात येत असल्याचं मेट्रो ट्रेन व्यवस्थापनानं (MTA) एका निवदेनाद्वारे जाहीर केलं आहे. हेही वाचा- 'चीनमध्येच कोरोना विषाणूची निर्मिती; वटवाघळाचा फक्त बहाणा'Let’s find him. This morning at the Queensbridge F station, the pictured male did push a 35 year old male onto the tracks causing serious physical injury. https://t.co/lQiYx9cCo6
— Asian Hate Crimes Task Force (@NYPDAsianHCTF) May 25, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: American indians, India america