जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / युक्रेनमध्ये अडकलेल्या डॉक्टरने भारतात परतण्यासाठी ठेवली अजब अट; जाणून व्हाल थक्क

युक्रेनमध्ये अडकलेल्या डॉक्टरने भारतात परतण्यासाठी ठेवली अजब अट; जाणून व्हाल थक्क

युक्रेनमध्ये अडकलेल्या डॉक्टरने भारतात परतण्यासाठी ठेवली अजब अट; जाणून व्हाल थक्क

कुमारने सांगितलं की ‘मी दुतावासात संपर्क साधला होता, मात्र मला काहीच मदत मिळाली नाही. माझ्या आजूबाजूचा परिसर रशियन सैनिकांनी घेरला आहे’.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 08 मार्च : युक्रेन आणि रशियामध्ये (Ukraine-Russia War) मागील काही दिवसांपासून विनाशकारी युद्ध सुरू आहे. यादरम्यान अनेक भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकले असून मिशन गंगाच्या माध्यमातून त्यांना भारतात परत आणलं जात आहे. अशात युक्रेनमधील युद्धात अडकलेल्या एका बांदी गिरी कुमार नावाच्या भारतीय डॉक्टरला आपल्या पाळीव बिबट्या आणि ब्लॅक पँथरचीच चिंता जास्त आहे (Indian Doctor Refuses to Leave Ukraine). डॉ. कुमार युद्धग्रस्त युक्रेनमधील डोनबास क्षेत्रातील एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हा फक्त माझ्या सुरक्षेचा आणि आयुष्याचा प्रश्न नाही, तर माझ्यासोबतच बिबट्या आणि ब्लॅक पँथरच्याही सुरक्षेचा सवाल आहे.

युक्रेनियन चिमुकलीचा भावुक करणारा VIDEO आला समोर, पाहूनच पाणावतील डोळे

कुमारने आपल्या पाळीव प्राण्यांशिवाय भारतात येण्यास नकार दिला आहे. कुमारने सांगितलं की मी दुतावासात संपर्क साधला होता, मात्र मला काहीच मदत मिळाली नाही. कुमारने सांगितलं की माझ्या आजूबाजूचा परिसर रशियन सैनिकांनी घेरला आहे. आंध्र प्रदेशच्या पश्चिमी गोदावरी जिल्ह्यातील तनुकू येथील रहिवाली कुमार यांनी पीटीआयसोबत बोलताना सांगितलं की, माझ्याकडे तोपर्यंत स्वतःला आणि माझ्या पाळीव प्राण्यांना वाचवण्याशिवाय काही चारा नाही, जोपर्यंत देव काहीतरी आशेचा किरण दाखवत नाही. देव महान आहे. मी सगळ्यांना स्पष्ट सांगतो, की हा माझ्या आयुष्याचा किंवा मला वाचवण्याचा प्रश्न नाही तर माझ्या पाळीव प्राण्यांच्या सुरक्षेचा आणि आयुष्याचा प्रश्न आहे. कुमारच्या पाळीव बिबट्याचं नाव ‘यगवार’ आणि ब्लॅक पँथरचे नाव ‘सब्रिना’ आहे. कुमारने सांगितलं की “मी त्यांना (पाळीव प्राण्यांना) माझ्या स्वतःच्या मुलांप्रमाणे वागवतो आणि ते खूप लहान आणि एकाकी असल्यापासून मी त्यांना वाढवलं ​​आहे,” कुमारने सांगितलं की त्यांनी 2020 मध्ये प्राणिसंग्रहालयातून या आजारी बिबट्याला आपल्या घरी आणलं होतं तर काही महिन्यांपूर्वीच ‘सब्रिना’ त्यांना सापडली होती.

PM मोदी आणि झेलेन्स्की यांच्यात 35 मिनिटं फोनवर चर्चा, या मुद्द्यांवर दिला भर

हाडांचे डॉक्टर कुमार डोनबासमध्ये बिबट्या, ब्लॅक पँथर आणि इटालियन कुत्र्यांसह राहतात. डॉनबास हे युक्रेनमधील भाग आहे जिथे सध्या भीषण लढाई सुरू आहे. कुमार म्हणाले की, या प्राण्यांचं भारतात पुनर्वसन करणं अवघड काम आहे कारण त्यासाठी अनेक ठिकाणची मंजुरी घ्यावी लागेल आणि इतर व्यवस्थाही कराव्या लागतील. सध्या त्यांच्याकडे खाण्यापिण्यासाठीही अगदी थोडंच सामान उरलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात