Home /News /videsh /

Pakistan Terrorist Attack: बलुचिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला, 10 सैनिकांचा मृत्यू; एक दहशतवादी ठार

Pakistan Terrorist Attack: बलुचिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला, 10 सैनिकांचा मृत्यू; एक दहशतवादी ठार

Pakistan Terrorist Attack: पाकिस्तानच्या (Pakistan) बलुचिस्तान (Balochistan) प्रांतात मोठा दहशतवादी हल्ला (Terrorist Attack) झाला आहे.

    कराची, 28 जानेवारी: पाकिस्तानच्या (Pakistan) बलुचिस्तान (Balochistan) प्रांतात मोठा दहशतवादी हल्ला (Terrorist Attack) झाला आहे. या दहशतवादी हल्ल्यात 10 जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) चे महासंचालक मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी सांगितले की, गुरुवारी बलुचिस्तानच्या केच जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सुरक्षा चौकीवर गोळीबार केला. या हल्ल्यात 10 जवान शहीद झाले आहेत. लष्कराच्या मीडिया विंगनं एका निवेदनात म्हटलं आहे की, ही घटना 25 ते 26 जानेवारीच्या मध्यरात्री घडली, ज्यामध्ये एक दहशतवादी ठार झाला आणि अनेक जण जखमी झाले. WHO च्या शास्त्रज्ञांनीच घाबरवलं, लवकरच येणार Coronaचा धोकादायक व्हेरिएंट 'डॉन' वेबसाइटच्या वृत्तानुसार, सुरक्षा दलांनी या हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांना पकडले आहे, तर ते अद्याप या घटनेत सहभागी असलेल्या इतर दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. आपल्या भूमीतून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सशस्त्र दल कटिबद्ध आहे, त्यासाठीकोणतीही किंमत मोजायला पाकिस्तान तयार असल्याचं निवेदनात म्हटलं आहे. अफगाणिस्तानच्या सत्तेवर कब्जा केलेला तालिबान पाकिस्तानसाठी वाईट ठरत आहे. पाकिस्तान इन्स्टिट्यूट फॉर कॉन्फ्लिक्ट अँड सिक्युरिटी स्टडी (PICSS)च्या अहवालात म्हटलं आहे की, 10 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत एक महिन्याचा युद्धविराम असूनही दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. पाकिस्तानमध्ये दर महिन्याला होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांची सरासरी संख्या 2020 मधील 16 वरून 2021 मध्ये 25 पर्यंत वाढली आहे, जी 2017 नंतर सर्वाधिक आहे. 103 हल्ल्यात 170 ठार बलुचिस्तान हा पाकिस्तानमधील सर्वाधिक अशांत प्रांत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. जिथे 103 हल्ल्यांमुळे 170 लोकांचा मृत्यू झाला आहे. अहवालानुसार, बलुचिस्तानमध्ये सर्वाधिक जखमींचीही नोंद झाली आहे. हल्ल्यात जखमी झालेल्यांपैकी 50 टक्क्यांहून अधिक लोक या प्रांतात हल्ल्याचे बळी ठरले आहेत. बलुचिस्ताननंतर खैबर पख्तुनख्वा हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक प्रभावित क्षेत्र असल्याचे अहवालात म्हटलं आहे. अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानच्या हस्तक्षेपावर तज्ज्ञ चिंता व्यक्त करत आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की पाकिस्तान तालिबानला जाहीरपणे पाठिंबा देत आहे, ज्यामुळे केवळ प्रादेशिक संघर्ष वाढेल. लष्करी स्थापनेवर परिणाम होऊ शकतो या परिस्थितीमागे नेत्यांचे वैयक्तिक स्वार्थही कारणीभूत आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या कृतींवर पडदा पडू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला. याचा विशेषतः लष्करी आणि गुप्तचर आस्थापनांवर परिणाम होऊ शकतो. मात्र, सर्व हल्ले होऊनही पाकिस्तान सरकार तालिबानबाबत मवाळ आहे. खुद्द पंतप्रधान इम्रान खान अनेक प्रसंगी तालिबानच्या प्रवक्त्याप्रमाणे बोलताना दिसतात.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Pakistan, Terrorist attack

    पुढील बातम्या