जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / नासाच्या प्रमुख पदी भारतीय वंशाच्या महिलेची वर्णी; जाणून घ्या Bhavya Lal यांच्याविषयी

नासाच्या प्रमुख पदी भारतीय वंशाच्या महिलेची वर्णी; जाणून घ्या Bhavya Lal यांच्याविषयी

नासाच्या प्रमुख पदी भारतीय वंशाच्या महिलेची वर्णी; जाणून घ्या Bhavya Lal यांच्याविषयी

Bhavya Lal NASA News Updates: भारतीय वंशाच्या भव्या लाल यांची अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या कार्यकारी प्रमुख म्हणून निवड झाली आहे. त्यांनी अमेरिकेत विविध महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 02 फेब्रुवारी: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांच्या प्रशासनात अनेक भारतीय वंशांच्या लोकांनी बाजी मारल्यानंतर भारतीय वंशाच्या आणखी एका महिलेची महत्त्वाच्या पदावर वर्णी लागली आहे. भारतीय- अमेरिकी वंशाच्या असणाऱ्या भव्या लाल (Bhavya Lal  यांची अमेरिकन अंतराळ संस्था अर्थातच नासाच्या प्रमुख म्हणून निवड झाली आहे. त्यामुळं त्याचं प्रत्येक स्तरातून कौतुक केलं जात आहे. भव्या लाल या अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या नासामध्ये संभाव्य बदल करणाऱ्या समितीच्या सदस्या आहेत. अमेरिकेची अंतराळ संस्था असणाऱ्या नासाने एक निवेदन जारी केलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, भव्या लाल यांच्याकडे अभियांत्रीकी आणि अंतरिक्ष तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे. शिवाय भव्या लाल अंतरिक्ष तंत्रज्ञान आणि नीती संघटनेच्या सदस्याही राहिल्या आहेत. त्याचबरोबर भव्या लाल यांनी 2005 ते 2020 दरम्यान इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स अॅनारलिसिस सायन्स अँड टेक्नॉलजी पॉलिसी इन्स्टिट्यूटमध्ये रिसर्च स्टाफ म्हणूनही काम केलं आहे. (हे वाचा- याठिकाणी गुंतवणूकदारांची सोन्यापेक्षा चांदीला पसंती! चांदीने गाठला उच्चांक ) भव्या लाल यांनी मोठ्या पदावरही काम केलं आहे भव्या स्पेस टेक्नीक आणि पॉलिसी कम्युनिटीच्या कार्यक्षम सदस्या आहेत. त्यांनी नॅशनल अॅकॅडेमी ऑफ सायन्स समितीच्या अध्यक्षा तसेच सह अध्यक्षा म्हणूनही काम पाहिलं आहे. त्याचबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञान संशोधन आणि कन्सल्टेन्सी संस्था C-STPS LLC च्या अध्यक्षाही राहिल्या आहेत. (हे वाचा- Tax Free Country! ‘या’ देशांमधील नागरिकांना भरावा लागत नाही कोणताही टॅक्स ) अंतरिक्ष क्षेत्रासाठी व्यापक योगदान भव्या लाल यांनी अंतरिक्ष क्षेत्रासाठी मोठं योगदान दिलं आहे. त्या इंटरनॅशनल अॅकेडमी ऑफ एस्ट्रोनॉटच्या सदस्याही आहेत. त्यांनी Massachusetts Institute of Technology या प्रतिष्ठित संस्थेतून विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयात पदवीत्तोर शिक्षण पूर्ण केलं आहे. त्याचबरोबर वॉशिंग्टन विद्यापीठातून त्यांनी पब्लिक पॉलिसी विषयात पीएचडी पूर्ण केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: nasa
  • First Published :
जाहिरात
जाहिरात