मराठी बातम्या /बातम्या /विदेश /भारताकडून संकटात असलेल्या श्रीलंकेला मोठी मदत; उपाशी झोपणाऱ्या नागरिकांना मिळेल दिलासा

भारताकडून संकटात असलेल्या श्रीलंकेला मोठी मदत; उपाशी झोपणाऱ्या नागरिकांना मिळेल दिलासा

श्रीलंकेतील भीषण आर्थिक संकट आणि प्रचंड निदर्शने यामुळे देशभरात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. हिंसाचार आणि निदर्शने पाहता राष्ट्रपतींनी देशभर संचारबंदी जाहीर केली आहे.

श्रीलंकेतील भीषण आर्थिक संकट आणि प्रचंड निदर्शने यामुळे देशभरात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. हिंसाचार आणि निदर्शने पाहता राष्ट्रपतींनी देशभर संचारबंदी जाहीर केली आहे.

श्रीलंकेतील भीषण आर्थिक संकट आणि प्रचंड निदर्शने यामुळे देशभरात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. हिंसाचार आणि निदर्शने पाहता राष्ट्रपतींनी देशभर संचारबंदी जाहीर केली आहे.

मुंबई, 2 एप्रिल : श्रीलंका आपल्या इतिहासातील सर्वात भीषण आर्थिक संकटातून (Economic Crises in Sri Lanka) जात आहे. पेट्रोल, डिझेल यासारखे अत्यंत महत्त्वाचे इंधन संपले आहे. वीजनिर्मिती होत नाही. जीवनावश्यक वस्तू आयात करण्यासाठी सरकारकडे पैसाच शिल्लक नाही. त्यामुळे जवळपास सर्वच वस्तूंचे भाव सातत्याने वाढत (Inflation) आहेत. जीवनावश्यक वस्तू अनेकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहे. हळुहळू सर्व काही ठप्प होत आहे.

परकीय चलनाचा साठा जवळपास संपुष्टात आलेल्या आणि अनेक देशांच्या कर्जबाजारी देशावर दिवाळखोरीचे संकट उभे राहिले आहे. श्रीलंकेला या संकटातून बाहेर काढण्यासाठी अनेक देश पुढे आले आहेत पण त्यात भारताची भूमिका सर्वात जास्त आहे. अनेकांना कित्येक दिवसांपासून अन्नाचा एक कणही मिळालेला नाही. अशात उपासमारी संपवण्यासाठी भारताने श्रीलंकेला 40000 टन तांदूळ पुरवठा केला आहे. विशेष म्हणजे श्रीलंकेत मोठ्या सणाआधी तांदूळ पुरवठा केला जात आहे. भारताच्या या मदतीमुळे श्रीलंकेला काहीसा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.

Russia Ukraine War: रशिया युक्रेन युद्ध कसे संपेल? कोणाला घ्यावी लागेल माघार? या आहेत मुख्य शक्यता

श्रीलंकेत आणीबाणी लागू

श्रीलंकेतील भीषण आर्थिक संकट आणि प्रचंड निदर्शने यामुळे देशभरात आणीबाणी (Emergency in Sri Lanka) लागू करण्यात आली आहे. हिंसाचार आणि निदर्शने पाहता राष्ट्रपतींनी देशभर संचारबंदी जाहीर केली आहे.

युक्रेनचं जोरदार प्रत्युत्तर; रशियन तेल डेपोवर हेलिकॉप्टरने हल्ला, भीषणता दाखवणारा LIVE VIDEO

श्रीलंकेत महागाईचा स्फोट

पेट्रोल पंपावर इंधनासाठी दोन किलोमीटर लांब रांगा लागत आहेत. खाद्यपदार्थ इतके महाग झाले आहेत की लोकांना उपाशी झोपावे लागत आहे. पेट्रोलपेक्षाही महाग दूध विकले जात आहे. एक कप चहाची किंमत 100 रुपयांवर गेली आहे. मिरची 700 रुपये किलोने विकली जात आहे. एक किलो बटाट्यासाठी 200 रुपये मोजावे लागत होते. वीजनिर्मितीवरही परिणाम झाला आहे. आता अनेक शहरांमध्ये 12 ते 15 तास वीजपुरवठा खंडित होत आहे. अशा परिस्थितीत भारताने श्रीलंकेला तातडीने एक अब्ज डॉलर्सची मदत दिली आहे.

भारताने श्रीलंकेला 1 अब्ज डॉलरची क्रेडिट लाइन देण्यास सहमती दर्शवली आहे. यामुळे श्रीलंकेला जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भरून काढण्यास मदत होणार आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यात करणारा देश आहे. अशा परिस्थितीत भारतातून तांदळाची खेप श्रीलंकेत पोहोचल्यानंतर तिथल्या तांदळाच्या किमती खाली येण्याची अपेक्षा आहे, जे गेल्या वर्षभरात दुपटीने वाढले आहे.

First published:
top videos

    Tags: Economic crisis, India, Money, Sri lanka