याचीच भीषणता दर्शवणारे व्हिडिओ आता समोर आले आहेत. व्हिडिओमध्ये दिसतं की युक्रेनच्या सशस्त्र दलाच्या दोन हेलिकॉप्टरने रशियातील बेल्गोरोडमधील तेल डेपोवरच निशाणा साधत हल्ला केला. यामुळे या आगीचा मोठा भडका उडाला. हल्ल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.युक्रेनचं जोरदार प्रत्युत्तर; रशियन तेल डेपोवर हेलिकॉप्टरने हल्ला pic.twitter.com/zXX0Ixox9B
— News18Lokmat (@News18lokmat) April 1, 2022
रशियाची कुख्यात स्नायपर युक्रेनच्या ताब्यात; ननपासून शूटर बनलेल्या महिलेनं केलीये 40 हून अधिकांची हत्या रशियाकडून वारंवार हल्ल्यानं युक्रेन आता हैराण झालं आहे. अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. युद्धाच्या सुरुवातीला रशियानं कीवला लक्ष्य केलं. सतत हल्ले होत होते. केवळ लष्करी तळांना लक्ष्य करणार असल्याचं सांगण्यात आलं. पण रशियन सैन्याने केवळ लष्करी तळच नव्हे तर निवासी भागांनाही लक्ष्य केलं. अखेर आता युक्रेननेही रशियला जशास तसं उत्तर देण्यास सुरुवात केल्याचं या व्हिडिओमधून दिसतं.युक्रेनचं रशियाला प्रत्युत्तर; तेल डेपोवर हेलिकॉप्टरने हल्ला, भीषणता दाखवणारा VIDEO pic.twitter.com/IYTNEZHDtq
— News18Lokmat (@News18lokmat) April 1, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.