नवी दिल्ली, 10 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) रविवारी सायंकाळी लॉकडाऊनची मर्यादा 14 एप्रिलहून अधिक वाढविण्याबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या राज्यांमधील लॉकलाऊनची मर्यादा वाढविली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यानंतरच लॉकडाऊनबाबत अंतिम निर्णय़ घेण्यात येईल. सांगितले जात आहे की, लॉकडाऊन वाढल्याने काही भागात अंशत: सूट मिळू शकते. कारण मोठ्या काळासाठी लॉकडाऊन कायम राहिल्याने विषम आर्थिक परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो.
मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाऊन वाढवण्याचं आवाहन
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त देशांतर्गत प्रवासावर प्रतिबंध असू शकतो. ओदिशाने गुरुवारी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांमंध्ये झालेल्या बैठकीच्या दोन दिवसांपूर्वी 30 एप्रिलपर्यंत ल़ॉकडाऊनची मर्यादा वाढवली आहे. लॉकडाऊनची मर्यादा वाढवणारं ओदिशा हे पहिलं राज्य ठरलं आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रेशखर राव यांच्यासह इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही लॉकडाऊन वाढविण्याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. देशातील अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची कोरोनाच्या संकटापासून बचाव करण्यासाठी लॉकडाऊन वाढविण्याचं आवाहन केलं आहे.
संबंधित- पुण्यातील नायडू रुग्णालयातील धोब्यासाठी महापौर गेले धावून, तुम्हीही कराल कौतुकCOVID-19: कच्च्या तेलाचे भाव उतरले,सरकार जमिनीखाली गुहांमध्ये करणार लाखो टन साठा
संपादन - मीनल गांगुर्डे
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.