जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / यांना कुणीतरी आवरा रे! 'कोरोना'मुळे विचित्र निर्णय, पॉर्नहब देणार प्रिमियम मोफत कंटेट

यांना कुणीतरी आवरा रे! 'कोरोना'मुळे विचित्र निर्णय, पॉर्नहब देणार प्रिमियम मोफत कंटेट

यांना कुणीतरी आवरा रे! 'कोरोना'मुळे विचित्र निर्णय, पॉर्नहब देणार प्रिमियम मोफत कंटेट

कोरोनाचा सर्वात जास्त फटका चीनला बसला. चीननंतर इटलीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. यामुळे अनेक जणांना घरी बसावं लागत आहे, या परिस्थितीत पॉर्नहब या पॉर्नसाइटने त्यांचा कंटेट मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

इटली, 13 मार्च : जगभरात कोरोना व्हायरस (Cororavirus) चा धोका वाढत आहे. भारतातही कोरोनाने थैमान घालायला सुरूवात केली आहे. दिवसेंदिवस भारतातली रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचे 17 रुग्ण आढळले आहेत. धोका लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली आहे की, ‘पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील शाळा बंद करण्यात येतील. तसंच 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा वगळता या दोन शहरांतील शाळा बंद करण्यात येणार आहेत, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. विदेशी नागरिकांसंदर्भातही भारतामध्ये कडक उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. जगभरात कोरोनासंदर्भात उपाय योजना करण्यासाठी सरकारसह सर्वचजण धडपडत आहेत. कोरोनाचा सर्वात जास्त फटका चीनला बसला. चीननंतर इटलीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. इटलीचे पंतप्रधान गिसीपी काँटे यांनी शटडाऊनची घोषणा केली असून अगदी महत्त्वाच्या कारणासाठी प्रवास करण्यास परवानगी आहे. मंगळवारपासून लागू करण्यात आलेले निर्बंध न पाळल्यास सक्तीची बंदी घालण्यात येणार आहे. (हे वाचा- कोरोनाला रोखण्यासाठी भारताकडे आहेत फक्त 30 दिवस, तज्ञांनी दिला इशारा ) या सक्तीच्या बंदीमुळे इटलीतील बहुतांश नागरिक घरी बसणार आहेत. जवळपास सहा कोटी जनतेला कुठेही जाण्याची परवानगी नाही आहे. या परिस्थितीत पॉर्न हब ही पॉर्न वेबसाईट प्रिमियम कंटेट मोफत देणार आहे. यासंदर्भात कंपनीकडून पत्रक जारी करण्यात आलं आहे. डेली मेलने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. त्यामुळे इटलीमधून 3 एप्रिलपर्यंत प्रिमियम कंटेंट पाहणं शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे ते मॉडेलहब या त्यांच्या वेबसाइटच्या कमाईचा पैसा इटलीला मदत म्हणून देणार आहेत. (हे वाचा- ऑनलाइन शॉपिंगही नको! प्लास्टिक पॅकेजिंगमधूनही येऊ शकतो कोरोना व्हायरस) अमेरिकेमध्ये सर्वाधिक जास्त प्रमाणात पॉर्नहब पाहण्यात येतं. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे जपान आणि युके आहे. इटलीचा यामध्ये सातवा क्रमांक लागतो. कंपनीने गेल्या वर्षी जाहीर केलेल्या यादीमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात