World Cup : रोहितचे 2 षटकार आणि धोनीचा खेळ खल्लास!

World Cup : रोहितचे 2 षटकार आणि धोनीचा खेळ खल्लास!

वर्ल्ड कपमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या रोहित शर्माचा महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमावर डोळा आहे.

  • Share this:

साऊदम्पटन, 22 जून : ICC Cricket World Cupमध्ये आज भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आज साऊदम्पटन मैदानावर सामना होत आहे. . भारताने आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये अपराजित राहत गुणतक्त्यात पहिल्या चारमध्ये आपले स्थान कायम राखलं आहे. तर, अफगाणिस्ताननं आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही, त्यामुळं त्याचे आव्हान वर्ल्ड कपमध्ये संपुष्टात आले आहे. तरी, भारताविरुद्ध चांगली खेळी करण्याचा त्यांचा मानस आहे.

भारतीय संघात सध्या फॉर्ममध्ये असलेल्या रोहित शर्माकडून सर्वात जास्त अपेक्षा आहेत. रोहिनं वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात रेकॉर्ड तोड फलंदाजी केली होती. मागील तीन सामन्यात त्यानं 2 शतक लगावले आहे. तर, एका अर्धशतकी खेळीचाही समावेश आहे. त्यामुळं अफगाणिस्तान विरोधातही अशीच दमदार खेळी करण्याची अपेक्षा रोहितकडून आहे. पण या सामन्यात रोहितचा डोळा असेल तो भारताचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या एका रेकॉर्डवर. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात रोहित धोनीचा सर्वात मोठा रेकॉर्ड मोडणार आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त षटकार लगावण्यात विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी रोहितला केवळ दोन षटकारांची गरज आहे. दुसरीकडे धोनीनं 292 सामन्यात 225 षटकार लगावले आहेत. तर, रोहितनं 203 सामन्यात 224 षटकार लगावले आहेत.

रोहितला केवळ 2 षटकारांची गरज

आजच्या सामन्यात धोनीचा रेकॉर्ड मोडण्यासाठी रोहितला केवळ दोन षटकारांची गरज आहे. त्यानंतर रोहित सर्वात जास्त षटकार लगावणारा भारतीय फलंदाज ठरले. तर, सर्वात जास्त षटकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत शाहिद आफ्रिदी 351 षटकारांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर ख्रिस गेल 318 आणि जयसुर्या 270 षटकारांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

रोहितच्या खेळीकडे लक्ष

रोहितनं वर्ल्ड कपमध्ये दमदार खेळी केली आहे. रोहितनं पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरोधात 122 धावांची तुफान खेळी केली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरोधात त्यानं 57 धावांची खेळी केली. तर, पाकिस्तान विरोधात रोहितची 140 धावांची वादळी खेळी दिसून आली. त्यामुळं आजच्या सामन्यातही रोहितकडून जास्त अपेक्षा आहेत.

वाचा- भारताच्या विजयात पावसाचा खोडा? काय आहे हवामानाचा अंदाज

वाचा- पंतने केला खुलासा, World Cup संघात नाव नाही हे समजल्यावर काय केलं

वाचा- विराटचा डोळा सचिन आणि लाराच्या विश्वविक्रमावर; अफगाणविरुद्ध आहे संधी!

पाकिस्तानी कर्णधाराचा चाहत्यांकडून अपमान, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 22, 2019 01:50 PM IST

ताज्या बातम्या