IND vs AFG : भारताच्या विजयात पावसाचा खोडा? काय आहे हवामानाचा अंदाज

IND vs AFG : भारताच्या विजयात पावसाचा खोडा? काय आहे हवामानाचा अंदाज

आयसीसी वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत चार सामने पावसामुळं रद्द झाले आहे.

  • Share this:

साऊदम्पटन, 22 जून : ICC Cricket World Cupमध्ये लीग स्टेजमधले सामने संपत आल्यामुळं आता सेमीफायनलचे चित्र स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत सर्व संघानी आपले पाच सामने खेळले आहेत. मात्र, इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्या सामन्यात श्रीलंकेने यजमानांना धुळ चारत स्पर्धेला एक वेगळेच वळण दिले. दुसरीकडे भारतीय संघानं आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत, यातील तीन सामन्यात विजय तर न्यूझीलंड विरुद्धचा सामना पावसामुळं रद्द झाला. आज भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात साऊदम्पटनच्या मैदानावर हा सामना रंगेल. मात्र या सामन्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जर, पावसामुळं सामना रद्द झाला तर, त्याचा फटका भारतीय संघाला बसेल.

आयसीसी वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत चार सामने पावसामुळं रद्द झाले आहे. यात भारत विरुद्ध न्यूझीलंड या सामन्याचाही समावेश आहे. त्यामुळं आयसीसीवर चाहते चांगलेच संतापले आहेत. वर्ल्ड कपमध्ये अजूनही रोमांचक सामने होणे बाकी आहेत. मात्र या सामन्यांवरही पावसाचे सावट आहे. दरम्यान, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात साऊदम्पटन मैदानावर सामना होत आहे, याच मैदानात वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना पावसामुळं रद्द झाला होता. त्यामुळं भारतीय चाहते चिंतेत आहेत. तरी, हवामना खात्यानं पावसाची शक्यता वर्तवली नाही आहे, मात्र संथ गतीनं पाऊस बरसू शकतो.

अभ्यास सत्र झाले होते रद्द

बुधवारी पावसामुळं दोन्ही संघांचे अभ्यास सत्र रद्द झाले होते. तर, गुरुवारी संथ प्रमाणात पाऊस बरसला. त्यामुळं दोन दिवस भारतीय संघाला सराव करता आला नाही. भारतीय संघ मैदानात सरावासाठी उतरल्यानंतर पावसामुळं त्यांना सराव थांबवावा लागला. गुरुवारी उशीरा पर्यंत पाऊस पडत होता, मात्र शुक्रवारी काही काळ वातवरण ढगाळ होते. अफगाणिस्तान संघानं आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही. त्यामुळं त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.

असे असेल हवामान

स्थानिक वेळेनुसार दुपारी 12 वाजेपर्यंत साऊदम्पटनमध्ये ऊन असेल. यानंतर वातावरण थोडं ढगाळ होऊन, जोरदार वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. या दिवसाचं तापमान 13 ते 20 डिग्री सेल्सिअ्सपर्यंत असेल.

पाऊस पडल्यास भारताला फटका

पावसामुळं भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना एक-एक गुण देण्यात येतील. त्यामुळं भारतीय संघाच्या खात्यात 8 गुण जमा होतील. तर, अफगाणिस्तानचे खाते उघडले जाईल. नॉक आऊट फेरीत भारताला याचा फटका बसेल.

पाकिस्तानी कर्णधाराचा चाहत्यांकडून अपमान, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 22, 2019 11:05 AM IST

ताज्या बातम्या