लंडन, 21 जून : भारताचा युवा क्रिकेटपटू रिषभ पंतला सलामीवीर शिखर धवन दुखापतीने बाहेर पडल्यानं संघात स्थान मिळालं आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी तो इंग्लंडला पोहचला असून भारतीय संघासोबत सराव करताना तो दिसत आहे. सुरुवातीला जाहिर करण्यात आलेल्या वर्ल्ड कप संघात पंतला स्थान नव्हते. त्याबद्दल युझवेंद्र चहलने पंतला विचारले असता आपण त्यानंतर सकारात्मक राहिल्याचं सांगितलं. रिषभ पंत म्हणाला की, जेव्हा मला समजलं की माझी निवड झालेली नाही तेव्हा माझंच काहीतरी चुकलं असेल म्हणून संघात स्थान मिळवू शकलो नाही असं वाटलं. त्यानंतर सकारात्मक होऊन खेळ सुधारण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आणि सरावसुद्धा सुरू ठेवला. आपल्या सर्वांचं स्वप्रन आहे भारताला विजय मिळवून देणं. जेव्हा मला समजलं की मला इंग्लंडला जायचं आहे तेव्हा ही गोष्ट मी आईला सांगितली. त्यानंतर आईने मंदिरात जाऊन पूजा केली असंही रिषभ पंतने सांगितलं. तो म्हणाला की, पहिल्यापासून वर्ल्ड कप खेळण्याचं स्वप्न होतं. आता संधी मिळाली आहे त्यामुळे आनंदी आहे. रिषभ पंतने आतापर्यंत 5 एकदिवसीय सामने खेळले आहेत. याशिवाय 9 कसोटी सामन्यात त्याने आपला खेळ दाखवला आहे. यात त्याने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये खेळताना शतकसुद्धा केलं आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये रिषभ पंतने 16 सामन्यात 488 धावा केल्या. वाचा- विराटसाठी आनंदाची बातमी, वर्ल्ड कप गाजवणारा अष्टपैलू खेळाडू फिट वाचा- वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या विराटसेनेचं रुप पालटलं, PHOTO व्हायरल वाचा- …म्हणून पाक संघानं ऐकला नाही PM इमरान यांचा सल्ला सानियासाठी ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ उतरली मैदानात, ट्रोल करणाऱ्यांना खडसावलं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







