मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

खरंच माणूस 150 वर्ष जगू शकतो?, जाणून घेऊया संशोधन काय सांगते

खरंच माणूस 150 वर्ष जगू शकतो?, जाणून घेऊया संशोधन काय सांगते

Representative Image (Source: Pixabay)

Representative Image (Source: Pixabay)

एका कॉम्प्युटर मॉडेलचा (Computer Model) उपयोग करुन त्यांनी माणसाचे कमाल आयुर्मान 150 वर्ष असल्याचे अनुमान लावले आहे.

  • Published by:  Sunil Desale

ब्रिटन, 10 जून : आपल्यापैकी अनेक लोक आम्ही वयाच्या 80 वर्षांपर्यंत जगू अशी आशा बाळगतात. परंतु, काही लोक यापुढे जात 100 वर्षांपेक्षा अधिक वर्षे जगतात. ओकिनावा, जपान, सार्डिनिया आणि इटलीसारख्या ठिकाणी असे अनेक लोक आहेत की त्यांनी वयाची शंभरी पार केली आहे. इतिहासातील सर्वाधिक वयस्कर व्यक्तींमध्ये फ्रान्सची (France) महिला जीन कॅलमेंट यांचे नाव घेतले जाते. त्या 122 वर्षांपर्यंत जगल्या. त्यांचा जन्म 1857 मध्ये झाला होता. त्या काळी सरासरी आयुर्मान (Life Span) सुमारे 43 वर्ष होते.

माणूस किती काळ जिवंत राहू शकतो हा प्रश्न लोक वर्षानुवर्षे विचारत आले आहेत. एकीकडे सरासरी आयुर्मान (एक व्यक्ती किती वर्षांपर्यंत जिवंत राहण्याची शक्यता आहे) गणना करणे तुलनेने सोपे आहे. परंतु, कमाल आयुर्मानाचे (एक व्यक्ती सुमारे किती वयापर्यंत जगू शकतो) अनुमान काढणे खूप कठीण आहे. मागील अभ्यासानुसार, ही सीमा 140 वर्ष वयाजवळ आणून ठेवण्यात आली होती. मात्र आता नव्या अभ्यासानुसार, माणसाच्या आयुर्मानाची सीमा ही 150 वर्षाजवळ असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आयुर्मानाची गणना

ब्राईटन विद्यापीठाचे रिचर्ड फराघेर यांनी याबाबत सांगितले की, आयुर्मान आणि आयुष्यमान मोजण्याची सर्वात जुनी आणि अद्याप वापरली जाणारी पध्दत म्हणजे गोम्पर्टझ समीकरण (Gompertz Equation). या संदर्भातील पहिले मूल्यांकन 19 व्या शतकात केले गेले. त्यानुसार, आजारानुसार होणाऱ्या मानवी मृत्यूचे प्रमाण काळानुसार वेगाने वाढते असे दिसून आले. नक्कीच याचा अर्थ असा आहे की कर्करोग, ह्दयरोग आणि इतर संसर्गामुळे मृत्यू (Death) होण्याची शक्यता दर 8 ते 9 वर्षांनी दुप्पट होत जाते. निरनिराळ्या घटकांमुळे लोकसंख्येचा आयुष्यावर कसा परिणाम होतो हे ठरवण्याचे बरेच मार्ग आहेत, ज्यात सूत्र बदलले जाऊ शकते.

येत्या काळात विशेष प्रकारचे पॉर्न बनू शकतात महासाथ; तज्ज्ञांनी केलं सावध

गोम्पर्टझ गणना आरोग्य विमा प्रिमियमची गणना करण्यासाठी देखील वापरली जाते. म्हणूनच या कंपन्या तुम्ही धुम्रपान करता का? तुम्ही विवाहीत आहात का? हे जाणून घेण्यासाठी उत्सूक असतात. यावरुन ते अंदाज लावू शकतात की तुम्ही आणखी किती काळ जगू शकता. वयानुसार आपल्या अवयवांची कार्यक्षमता कशी आहे आणि ती किती कमी झाली आहे, यावरुन देखील तुम्ही किती काळ जगू शकता याचे अनुमान लावता येते.

अवयवांच्या घटत्या कार्यक्षमतेची जुळणी आपण आपल्या वयाशी करतो. उदाहरण द्यायचे झाले तर, डोळ्यांचे कार्य आणि व्यायामावेळी आपण किती ऑक्सिजन वापरतो हे वयानुसार घटल्याचे सामान्य रुपात दिसते. परंतु, बहुतेक गणितं असं दर्शवतात की साधारण व्यक्तीचे वय 120 वर्ष होईपर्यंत ते कार्य करु शकतात.

कमाल आयुर्मान 150 वर्ष असल्याचे अनुमान

हा अभ्यास लोकांमधील वाढत्या वयासोबत त्यांच्यात वाढलेली भिन्नता देखील स्पष्ट करतो. उदाहरणार्थ काही लोकांची किडनीची कार्यक्षमता वेगाने कमी होते तर काही लोकांमध्ये होत नाही. आता अमेरिका, सिंगापूर आणि रशियातील संशोधकांनी माणसाच्या कमाल आयुर्मानाचे अनुमान लावण्यासाठी एक वेगळा दृष्टीकोन अवलंबला आहे. एका कॉम्प्युटर मॉडेलचा (Computer Model) उपयोग करुन त्यांनी माणसाचे कमाल आयुर्मान 150 वर्ष असल्याचे अनुमान लावले आहे.

रोज शिजवता मायक्रोवेव्हमध्ये जेवण; साईड इफेक्ट माहिती आहेत का?

150 वर्षांपर्यंतचे आयुर्मान

स्वाभाविकपणे, आपल्या मृत्यूची शक्यता आणि आपण आजारातून किती वेगात बरे होता यामध्ये संबंध असावा, असे वाटते. हे आपल्या शरीराचे सामान्य संतुलन राखण्याचा एक उपाय आहे. परंतु, वाढत्या वयासोबत हे संतुलन राखण्याची क्षमता कमी होत जाते. सर्वसाधारणपणे व्यक्तीचे वय जितके कमी तितक्या लवकर तो आजारातून बरा होतो. परंतु, अशा अंदाजनुसार असे मानले जाते की सध्याच्या जुन्या लोकसंख्येस नवीन प्रयोगांचा फायदा होणार नाही. त्यांना सामान्य आजारांवर कोणतेही नवे वैद्यकीय उपचार मिळणार नाहीत. जरी या दिशेने प्रगती केली तर काहींना याचा फायदा होतो तर काहींना होत नाही. उदाहरणार्थ, आज जन्मलेला मुलगा आपले आयुर्मान वाढवण्यासाठी सुमारे वयाच्या 85 वर्षांपर्यंत वैद्यकिय प्रगतीवर अवलंबून राहू शकतो. मात्र आज वय वर्ष 85 असलेली व्यक्ती आपल्या आयुर्मानासाठी सध्याच्या वैद्यकीय तंत्रापुरता मर्यादित नसतो.

हॉलिवूडचं संस्कृत प्रेम; टॅटूसाठी देवनागरी लिपी आणि संस्कृत वचनांची चलती, पाहा PHOTO

3 महत्वपूर्ण गोष्टींची आवश्यकता

संशोधनानुसार, कमाल आयुर्मानासाठी तुम्हाला 3 महत्वपूर्ण गोष्टींची आवश्यकता आहे. एक म्हणजे चांगली गुणसूत्र की जी 100 वर्षांपेक्षा जास्त काळ जिवंत राहण्याची आशा निर्माण करतात. दुसरे म्हणजे चांगला आहार आणि व्यायम, यामुळे तुमचे आयुर्मान सुमारे 15 वर्षांनी वाढू शकते. आणि तिसरे म्हणजे वेळेनुरूप उपचार आणि औषधांबाबतच्या ज्ञानाची वृध्दी या गोष्टी तुमचा आरोग्यपूर्ण आयुर्मान वाढवण्यास मदत करतात.

सद्यःस्थितीत स्तन्य प्राण्यांचे आरोग्यपूर्ण आयुर्मान 15 ते 20 टक्क्यांनी वाढणे अवघड आहे. कारण वृध्दत्वाच्या जीवशास्त्राविषयीची आपली समज अपूर्ण आहे. परंतु सध्याचा प्रगतीचा वेग बघता, आयुर्मान वृध्दी होईल अशी आशा करण्यास काहीच हरकत नाही.

First published:

Tags: Health, Lifestyle