मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

येत्या काळात विशेष प्रकारचे पॉर्न बनू शकतात महासाथ; तज्ज्ञांनी केलं सावध

येत्या काळात विशेष प्रकारचे पॉर्न बनू शकतात महासाथ; तज्ज्ञांनी केलं सावध

डिपफेक पॉर्नोग्राफीबाबत (Deepfake pornography) तज्ज्ञांनी सावध केलं आहे.

डिपफेक पॉर्नोग्राफीबाबत (Deepfake pornography) तज्ज्ञांनी सावध केलं आहे.

डिपफेक पॉर्नोग्राफीबाबत (Deepfake pornography) तज्ज्ञांनी सावध केलं आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 09 जून : सध्या सर्वत्र कोणत्या महासाथीची (Corona pandemic) चर्चा आहे तर ती म्हणजे कोविड-19. पण भविष्यात आता आणखी एका महासाथीची शक्यता वर्तवली जाते आहे. ही महासाथ म्हणजे कोणत्या आजाराची नाही तर पॉर्नची आहे. एका खास प्रकारचे पॉर्न (Porn) येत्या दिवसात महासाथ (Porn epidemic) बनू शकते, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे.

सध्या प्रगत टेक्नॉलॉजी आणि इंटरनेटसोबत पॉर्न कल्चरही वाढतं आहे. येत्या काही काळात डिपफेक पॉर्नोग्राफी (Deepfake pornography) लैंगिक शोषणाची महासाथ (epidemic of abuse) ठरू शकते, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे.

डिपफेक टेक्नॉलॉजी म्हणजे कॉम्प्युटर तंत्रज्ञानाचा वापर करून एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीचा चेहरा लावता येतो आणि हा चेहरा दुसऱ्या व्यक्तीचा आहे, हे ओळखणंही शक्य होत नाही. हे तंत्रज्ञान व्हिडीओमध्येही वापरलं जातं. त्यामुळे विशेषतः महिलांसाठी हे खूप धोकादायक ठरू शकतं.

हे वाचा - लग्नात मिळालं असं गिफ्ट; पाहताच नवरी झाली लाजेनं गुलाबी, नवरदेव हैराण

डिपफेक्सचे तज्ज्ञ हेनरी एजडर या टेक्नॉलॉजीच्या डेव्हलपमेंटकडे बारकाईने लक्ष देऊन आहेत. बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं, डिपफेकचा क्रेझ  2017 सालच्या आसपास सुरू झालं. एका व्यक्तीने एक ओपन सोर्स सॉफ्टवेअर शेअर करत हे तंत्रज्ञाना सामान्य लोकांसाठी सोपं बनवलं.

सुरुवातीला यासाठी कठीण असे व्हिजुअल इफेक्ट्स आणि प्रोग्रामिंगची गरज होती, आता हे लोकांच्या कॉम्प्युटर कौशल्यावर अवलंबून आहे. याचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होऊ शकतो आणि त्याचं गांभीर्य ओळखण्याची गरज आहे.

शेफिल्डमध्ये राहणाऱ्या लेखिका हेलेन मोर्ट यांनी दोन वर्षांपूर्वी एका पॉर्न वेबसाईटवर आपले डिपफेक फोटो पाहिले. 2017 पासूनच हे फोटो इंटरनेटवर होते. हे फोटो पाहून आपल्याला मोठा धक्का बसल्याचं हेलेन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. सुदैवाने कोणी आपल्या चेहऱ्याचा वापर करून डिपफेक व्हिडीओ बनवला नाही, असं ती म्हणाली. तिने हे फोटो हटवले आहेत, पण तिच्या फोटोंचा वापर कोणी केला हे मात्र अद्याप तिला समजलेलं नाही.

हे वाचा - हॉलिवूडचं संस्कृत प्रेम; टॅटूसाठी देवनागरी लिपी आणि संस्कृत वचनांची चलती

डरहम युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक मेक्ग्लायन यांनी याप्रकरणी सांगितलं की, "सध्या डिपफेकची शिकार झालेल्या लोकांची संख्या कमी आहे. पण जर याबाबत सावधानता बाळगली नाही, तर भविष्यात ही मोठी समस्या बनू शकते. तर आपण या तंत्रज्ञानावर नियंत्रण मिळवलं नाही आणि हे सर्व बदलण्याचा प्रयत्न केला नाही तर हे एक महासाथीचा रूप घेऊ शकतं. याला शोषणाची महासाथ म्हणणं चुकीचं ठरणार नाही"

First published:

Tags: Porn video, Sex