मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

रोज शिजवता मायक्रोवेव्हमध्ये जेवण; साईड इफेक्ट माहिती आहेत का?

रोज शिजवता मायक्रोवेव्हमध्ये जेवण; साईड इफेक्ट माहिती आहेत का?

मायक्रोवेवमध्ये जेवण आणि दूध गरम केल्यामुळे शरीरातले रेड ब्लड सेल्स कमी व्हायला लागतात.

मायक्रोवेवमध्ये जेवण आणि दूध गरम केल्यामुळे शरीरातले रेड ब्लड सेल्स कमी व्हायला लागतात.

स्वयंपाक करण्यासाठी किंवा जेवण गरम करण्यासाठी दररोज मायक्रोवेव्ह (Microwave) वापरत असाल तर, त्याचे दुष्परिणाम (Side Effect) माहिती असणं फार महत्त्वाचं आहे.

  • Published by:  News18 Desk

दिल्ली, 9 जून: आधुनिक स्वयंपाकघरात मायक्रोवेव्ह (Microwave) आता अविभाज्य भाग बनला आहे. मायक्रोवेवमध्ये जेवण शिजवणं किंवा गरम करणं वेळ वाचवणारं आणि सोपं (Time Saving and Easy) असल्याने सर्रास वापर होतं आहे. मायक्रोवेव्ह सारख्या विद्युत उपकरणांमुळे आपलं स्वयंपाकघर खरोखरच आधुनिक (Modern Kitchen)बनवतं. पण, ते आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी हानिकारक(Harmful to Family Health)आहेत.

मेडिकल डेलीमध्ये देण्यात आलेला रिपोर्टनुसार, फिजिशियन डॉक्टर जोसेफ मोरोक्को (Physician Dr.Joseph Morocco) यांच्या मते आपण आपलं पोषक घटक असलेलं अन्न मायक्रोवेवमध्ये ठेवतो मात्र, त्याला इलेक्ट्रिक हीट (Electric heat) मिळाल्यामुळे ते ‘डेड फूड’(Dead Food) होऊन जातं. म्हणजेच त्यातली सगळी पोषद द्रव्य नष्ट होतात.

पदार्थ मायक्रोवेव्हमध्ये गेल्यानंतर त्यातील वॉटर मॉलेक्‍यूल्‍स (Water Molecules) तात्काळ उडून जातात आणि त्यानंतर जेवण वेगाने गरम व्हायला लागतं. या प्रक्रियेमुळे जेवणातल्या पोषक घटकांचं स्ट्रक्चर बदलतं आणि त्यामुळेच पोषक घटक हानिकारक न्यूट्रिएंट्समध्ये बदलून जातात.

(हॉलिवूडचं संस्कृत प्रेम; टॅटूसाठी देवनागरी लिपी आणि संस्कृत वचनांची चलती)

अनेक संशोधकांच्या मते मायक्रोवेव्ह मधलं जेवण दररोज घेतल्यामुळे रोग प्रतिकारक्षमता (Immunity) देखील कमी होऊन जाते. एवढंच नाही तर गर्भवती महिलेने मायक्रोवेव्ह मधलं जेवण खाल्ल्यास जन्माला येणाऱ्या बाळाला जन्मापासूनच व्यंग येऊ शकतात. याशिवाय मायक्रोवेवचा सतत वापर केल्यामुळे कॅन्सरचा धोका देखील वाढलेला असतो. मायक्रोवेवमध्ये जेवण करणाऱ्या लोकांमध्ये हाय ब्लड प्रेशर सारखे त्रास ही दिसून येतात.

महत्त्वाची माहिती

मायक्रोवेव्हमध्ये जेवण गरम करताना एखाद्या प्लास्टिकच्या भांड्यामध्ये ठेवून गरम केल्यास जेवणामध्ये कार्सिनोजेन्स तयार होतात आणि आरोग्याला हानी पोहचवतात.

(OMG! जुळी, तिळी नाही तर एकाच वेळी 10 बाळांना जन्म; महिलेनं मोडला वर्ल्ड रेकॉर्ड)

मायक्रोवेवच्या उष्णतेने अन्नात बीपीए, पॉलिथिलीन टर्पथॅलेट,बेन्‍जॉन सारखे कितीतरी टॉक्सिक केमिकल निर्माण होतात.

रशियन संशोधकांच्या मते मायक्रोवेवमध्ये जेवण आणि दूध गरम केल्यामुळे शरीरातले रेड ब्लड सेल्स कमी व्हायला लागतात आणि व्हाईट ब्लड सेल्स वाढायला लागतात. एवढंच नाही तर, कोलेस्ट्रॉलची पातळी देखील वाढते मायक्रोवेव रेडिएशनमुळे ब्लड आणि हार्ट रेट दोन्हीवरती प्रभाव पडतो.

First published:

Tags: Food, Health, Health Tips