मराठी बातम्या /बातम्या /विदेश /चीनच्या अध्यक्षांच्या नावाचं स्पेलिंग Xi Jinping आहे, तरीही उच्चार शी जिनपिंग असा का?

चीनच्या अध्यक्षांच्या नावाचं स्पेलिंग Xi Jinping आहे, तरीही उच्चार शी जिनपिंग असा का?

चिनी राष्ट्राध्यक्ष Xi Jinping यांच्या नावाचा उच्चार शी किंवा क्षी जिनपिंग असा केला जातो. X चा उच्चार असा का?

चिनी राष्ट्राध्यक्ष Xi Jinping यांच्या नावाचा उच्चार शी किंवा क्षी जिनपिंग असा केला जातो. X चा उच्चार असा का?

चिनी राष्ट्राध्यक्ष Xi Jinping यांच्या नावाचा उच्चार शी किंवा क्षी जिनपिंग असा केला जातो. X चा उच्चार असा का?

    नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर: जगातलं एक प्रबळ राष्ट्र म्हणून चीनची (China) ओळख आहे. महासत्ता मानल्या जाणाऱ्या अमेरिकेलाही (USA) आव्हान देण्याचं धाडस चीननं दाखवलं आहे. जगातली सर्वांत जास्त लोकसंख्या चीनमध्ये असून, ती सध्या 140 कोटी आहे. पूर्व आशियातला हा देश आता शस्त्रास्त्रं आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे अनेक नावीन्यपूर्ण संशोधनांच्या जोरावर जगावर राज्य करण्याचं स्वप्न बघत आहे. चौदा देशांच्या सीमा या देशाच्या सीमेशी जोडल्या आहेत. विस्तारवादी आक्रमक धोरणासाठी चीन प्रसिद्ध असून, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) या धोरणाचे मोठे पुरस्कर्ते आहेत. शी जिनपिंग आता तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष (President) होण्याची शक्यता आहे. अध्यक्ष निवडीसाठी चीनमध्ये सीपीसीची (CPC) बैठक सुरू असून, आज त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. माओत्से तुंग यांच्यानंतर कम्युनिस्ट पार्टीमधले सर्वाधिक शक्तिशाली नेते म्हणून जिनपिंग यांची ओळख आहे. जिनपिंग हे पुन्हा अध्यक्ष झाल्यास ते आजीवन चीनच्या राष्ट्राध्यक्षपदावर राहण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास चीनच्या विस्तारवादी भूमिकेला आणखी बळ मिळण्याची शक्यता आहे.

    शी जिनपिंग यांच्या नावाचं स्पेलिंग बघितलं तर उच्चार आणि स्पेलिंग यात फरक असल्याचं आढळून येतं. त्यामागे काय कारण आहे, हे जाणून घेऊ या. 'टीव्ही 9 हिंदी'ने याबद्दलची माहिती प्रसिद्ध केली आहे. इंग्रजीत शी जिनपिंग यांच्या नावाचं स्पेलिंग XI Jinping असं लिहिलं जातं.

    पुरुषांच्या तुलनेत महिला असतात अधिक चांगल्या बॉस, 'डील' करण्यातही माहीर- संशोधन

    स्पेलिंगमध्ये XI असूनही त्याचा उच्चार शी असा केला जातो. एखादी बिगर चिनी व्यक्ती शी जिनपिंग यांचं नाव वाचते तेव्हा त्यांना एक समस्या येते. त्यांना Xचा उच्चार इंग्रजी भाषेप्रमाणे करता येत नाही. Xचा उच्चार मराठीनुसार एक्स असा होतो, तेच इंग्रजीमध्ये XIचा उच्चार एक्सआय असा होतो. चीनच्या मँडरीन भाषेप्रमाणे X, Q आणि Jचे उच्चार वेगवेगळे होतात. यामध्ये X चा उच्चार स असा केला जातो. म्हणजेच XI चा योग्य उच्चार सी असा होतो. भारतात तो शी असा लिहिला जातो.

    चिनी भाषेनुसार Qचा उच्चार छ असा केला जातो, त्यामुळे Qi ला छी म्हणतात. J चा उच्चार च असा केला जातो, त्यामुळं Ju चा उच्चार चू असा केला जातो. चिनी भाषेनुसार नाव लिहिलं जात असलं तरी त्याचा उच्चार इंग्रजीप्रमाणे केला जात नाही, तर त्याचा उच्चार वेगळ्या पद्धतीने केला जातो. त्यामुळे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या नावाचं स्पेलिंग Xi Jinping असं असलं, तरी त्याचा उच्चार शी जिनपिंग असा केला जातो.

    Facebook ओपन केलं की महिला मारते चापट; भारतीय वंशाच्या अमेरिकन व्यक्तीची आयडिया

     मागे 2014 साली शी जिनपिंग भारताच्या दौऱ्यावर होते, तेव्हा दूरदर्शनच्या एका वृत्तनिवेदिकेने बातम्यांमध्ये असलेलं XI Jinping हे नाव इलेव्हन जिनपिंग असं वाचलं होतं. कारण रोमन आकड्यांनुसार XI चा अर्थ 11 अर्थात इलेव्हन असा होतो. त्या वृत्तनिवेदिकेचा बातम्या वाचताना गैरसमज झाल्याने इलेव्हन जिनपिंग असा उच्चार तिने केला. ती हंगामी वृत्तनिवेदिका म्हणून दूरदर्शनवर कार्यरत होती. या गंभीर चुकीनंतर तिला कामावरून काढून टाकण्यात आलं.

    First published:
    top videos

      Tags: China, Xi Jinping