• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • पुरुषांच्या तुलनेत महिला असतात अधिक चांगल्या बॉस, 'डील' करण्यातही माहीर; नव्या संशोधनातील निष्कर्ष

पुरुषांच्या तुलनेत महिला असतात अधिक चांगल्या बॉस, 'डील' करण्यातही माहीर; नव्या संशोधनातील निष्कर्ष

Women Boss Better take care of Employees : एका सर्वेक्षणानुसार, आता महिलांव्यतिरिक्त पुरुषांनाही महिला बॉससोबत काम करायला आवडतं. ज्या कार्यालयांमध्ये बॉस महिला असतात, त्या कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची कामगिरीही अनेक पटींनी सुधारते, असंही दिसून आलं आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर : आजच्या युगात महिला कोणत्याच क्षेत्रात पुरुषांच्या मागे नाहीत. जर आपण व्यवसाय आणि उद्योजकतेबद्दल बोलायचे झाल्यास त्यातही महिलांचाही मोठा वाटा आहे. काही काळापर्यंत महिला बॉसबाबत लोकांचा दृष्टीकोन चांगला नव्हता, पण आता हळूहळू या विचारसरणीत मोठा बदल होताना दिसत आहे. एका सर्वेक्षणानुसार, आता महिलांव्यतिरिक्त पुरुषांनाही महिला बॉससोबत काम करायला आवडतं. ज्या कार्यालयांमध्ये बॉस महिला असतात, त्या कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची कामगिरीही अनेक पटींनी सुधारते, असंही दिसून आलं आहे. या संदर्भात, SCIKEY या जॉब मार्केटमधील प्रसिद्ध कंपनीनं देशभरातून 22 ते 47 वयोगटातील 5388 लोकांची निवड केली. हे सर्वजण वेगवेगळ्या कंपनीत पुरुष आणि महिला बॉससोबत काम करत होते. ज्येष्ठ महिलांसोबत काम करणारे कर्मचारी त्यांच्या कामावर अधिक समाधानी असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले. याचं कारण महिला बॉस त्यांच्या कर्मचाऱ्यांशी चांगलं वर्तन ठेवतात, असं सांगण्यात (Women Boss Better take care of Employees) आलं. महिला बॉस कर्मचार्‍यांच्या व्यावसायिक वाढीकडे अधिक लक्ष देतात आणि त्यांना अधिक चांगल्या प्रशिक्षणाची आवश्यकता असल्यास त्या नेहमी तयार असतात. त्यामुळं कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत सुधारणा होते. हे वाचा - हवा प्रदूषणामुळं सायनसचा त्रास वाढलाय का? मग हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर तणावपूर्ण ठिकाणी काम करणं संशोधनानुसार, तणावपूर्ण कामाच्या ठिकाणी, महिला बॉस पुरुषांपेक्षा वरिष्ठ पदांवर चांगले काम करण्यास सक्षम असतात. संशोधनाच्या निकालांवरून असं दिसून आलं की वरिष्ठ पदांवर 6.67 टक्के स्त्रिया तणावपूर्ण ठिकाणी 4.96 टक्के पुरुषांच्या तुलनेत चांगलं काम करू शकल्या. करार (डील) करताना योग्य निर्णय घेणं या संशोधनात असंही समोर आलं आहे की, महिला बॉसमध्ये करार (डील) करताना वाटाघाटीद्वारे योग्य निर्णय घेण्याची क्षमता पुरुषांपेक्षा खूपच चांगली असते. सर्वेक्षणानुसार, केवळ 1.11 टक्के पुरुष बॉसने संभाषणातून चांगले परिणाम सिद्ध केले. त्याच वेळी महिला बॉसच्या बाबतीत हा आकडा 1.37 टक्के होता. हे वाचा - सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावरुन गदारोळ, ISIS आणि बोको हरामशी केली हिंदुत्वाची तुलना सुसंवाद साधण्याची क्षमता संशोधकांचे म्हणणे आहे की, महिला सामाजिकदृष्ट्या भिन्न लोकांच्या संपर्कात येतात. यामुळे त्यांच्यात संभाषणातून चांगले संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता अधिक असते.
  Published by:News18 Desk
  First published: