Home /News /videsh /

पायलटची तब्येत बिघडल्यानंतर प्रवाशाने प्लेन कसं केलं लँड; Video पाहून धक्काच बसेल!

पायलटची तब्येत बिघडल्यानंतर प्रवाशाने प्लेन कसं केलं लँड; Video पाहून धक्काच बसेल!

कसलाही अनुभव नसताना या प्रवाशाने विमानाची जबाबदारी घेतली. सध्या जगभरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

    वॉशिंग्टन, 13 मे : अमेरिकेतील (America News) बहामास ते फ्लोरिडाच्या दिशेने जाणाऱ्या विमानाचा पायलट अचानक आजारी पडल्यानंतर एका प्रवाशाने विमान लँड केल्याचा प्रकार समोर आला आहे. हे प्रकरण सर्वांनाच अचंबित करणारं आहे. अनुभव नसलेल्या प्रवाशाने विमान कसं उतरवलं असा सवाल उपस्थित केला जात आहे. (passenger landed the plane after the pilots health deteriorated) डारेन हैरिसन याने विमान व्यवस्थितपणे सांभाळले. त्यांना रेडिओच्या माध्यमातून सतत माहिती दिली जात होती. रेडिओवर त्या बाजूला असलेल्या रॉबर्टने हारेनला बळ दिलं आणि सुखरूपपणे विमान खाली उतरवण्यात आलं. या दोन्ही हिरोंनी अनेक प्रवाशांचे जीव वाचवले. रॉबर्टने सांगितलं की, या घटनेवेळी त्याने ब्रेक घेतला होता आणि टॉवरच्या बाहेर पुस्तक वाचत होता. त्याचवेळी एक सहकारी आला व त्याने घडलेला प्रकार सांगितला. त्याने सांगितलं की, एक प्रवाशी विमान चालवत आहे. पायलट आजारी पडला आहे. त्यामुळे आपल्याला काहीतरी करावं लागले. रॉबर्टने त्या प्रवाशाला विमान लँड करण्याची पद्धत सांगण्यास सुरुवात केली. प्रवाशी डारेनने एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये बसलेल्या रॉबर्टच्या मदतीने तब्बल 70 मैल लांब विमान सुरक्षितपणे लँड केलं. उड्डाणादरम्यान पायलटची तब्येत अचानक बिघडली होती. यावेळी प्रवाशांमधील कोणाला सिंगल इंजन सेसना 280 बद्दल काही माहिती असल्याची घोषणा करण्यात आली. यानंतर डारेन पुढे आला. तो खूप घाबरला होता. मात्र शांत राहून त्याने हे सर्व हँडल केलं. सुरुवातील विमान नेमकं कुठं आहे, याबाबत माहिती घेतली. आणि योग्य मार्गदर्शनाखाली विमान व्यवस्थित लँड केलं.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: America, Travel by flight

    पुढील बातम्या