Home /News /videsh /

येथे दर 30 वर्षांत एकदा अंडी देतो हा खडक; नागरिक चोरून काढतात पळ!

येथे दर 30 वर्षांत एकदा अंडी देतो हा खडक; नागरिक चोरून काढतात पळ!

निसर्गात अनेक अद्भुत (Wonders in the World) गोष्टी आहेत. त्यातल्या काही रहस्यांचा शोध लागलाय, तर काही अजूनही दडलेल्याच आहेत.

    नवी दिल्ली, 17 जून : निसर्गात अनेक अद्भुत (Wonders in the World) गोष्टी आहेत. त्यातल्या काही रहस्यांचा शोध लागलाय, तर काही अजूनही दडलेल्याच आहेत. चीनमध्ये अंडी देणाऱ्या (Rock Lays Eggs) मोठा पाषाणाबाबत अजूनही शास्त्रज्ञांचं संशोधन सुरू आहे. चीनच्या गिझोउ प्रांतात एका मोठ्या पाषाणातून दर 30 वर्षांनी काही गोल, गुळगुळीत दगड बाहेर पडतात. ‘चन दन या’ असं या मोठ्या खडकाचं नाव आहे. तेथील लोक या घटनेला देवाचा आशीर्वाद समजतात. कोंबडी, बदक किंवा पक्ष्यांची अंडी सगळ्यांना माहीत आहेत, पण चीनच्या नैऋत्येकडील गिझोउ प्रांतात एक मोठा खडकदेखील अंडी देतो. खरोखरच अंडी देण्याच्या प्रक्रियेप्रमाणे ही प्रक्रिया एका दगडात घडते. 30 वर्षं ही अंडी उबवण्याचं काम तो मोठा खडक करतो. त्यानंतर 30 वर्षांनी अंड्यांप्रमाणे दिसणारे गोल दगड हळूहळू त्या मोठ्या दगडापासून वेगळे होऊ लागतात. या मोठ्या खडकाची उंची 19 फूट आहे, तर लांबी 65 फूट आहे. असं म्हणतात, की हे अंड्यांसारखे दगड आपोआपोच त्या खडकाच्या आत तयार होतात आणि मग बाहेर पडतात. ‘चन दन या’ (Chan Dan Ya Rock) असं या खडकाचं नाव असून तो पूर्ण काळ्या रंगाचा आहे. त्यामुळे यातून बाहेर येणारी अंडीही काळ्याच (Black Color Eggs) रंगाची असतात. अंड्यांप्रमाणे बाहेरून गुळगुळीत दिसणारे ते दगड हळूहळू आपोआपच बाहेर पडायला लागतात. 30 वर्षं उबवल्यानंतर (Rock Lays Eggs Every 30 Years) जेव्हा ते गोल दगड परिपक्व होतात, तेव्हा बाहेर पडतात. या संपूर्ण प्रक्रियेचा शास्त्रज्ज्ञ अभ्यास करत आहेत, मात्र अजूनही त्याबद्दल काही ठोस निष्कर्ष निघालेला नाही. ‘चन दन या’ या नावाचा अर्थ अंडी देणारा दगड असा होतो. या मोठ्या दगडातून निघणाऱ्या अंड्यांना लोक आनंदाचं प्रतीक मानतात. त्यामुळे ही अंडी जमिनीवर पडली, की लगेच ती घेऊन लोक पळून जातात. ही अंडी काळी तर असतातच, पण बाहेरून थंडही असतात. भूगर्भ शास्त्रज्ञांच्या मते, हा मोठा खडक 50 कोटी वर्षांपूर्वीचा आहे. इतकी वर्ष तो सगळ्या प्रकारच्या तापमानात तग धरून उभा आहे. मात्र अंडी देण्याची त्या खडकाची प्रवृत्ती अजून बदललेली नाही. निसर्गातील काही गोष्टी आकलनापलीकडे असतात. चीनमधील अंडी देणारा खडकही तेथील गावकऱ्यांना कायमच आश्चर्यचकित करत आलाय. आता शास्त्रज्ज्ञही हे कोडं उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत.

    First published:

    Tags: China, Seven wonders of the world

    पुढील बातम्या