advertisement
होम / फोटोगॅलरी / विदेश / आरोग्य आणि सौंदर्याच्या दृष्टीने मृत समुद्राला का मानलं जातं जगातलं वरदान?

आरोग्य आणि सौंदर्याच्या दृष्टीने मृत समुद्राला का मानलं जातं जगातलं वरदान?

याला मृत समुद्र म्हणजेच डेड सी (Dead Sea) म्हणतात. परंतु, त्यात भरपूर जीवसृष्टी आहे. अनेक समुद्री जीव त्यात वाढतात. हा समुद्र आरोग्यासाठी खूप चांगला मानला जातो. त्यातून खनिजे काढली जातात. हा जगातील सर्वात जास्त खारट पाण्याचा समुद्र आहे. एकूणच, मृत समुद्र हा गूढतेने भरलेला असा महासागर आहे. या समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असल्याने यात कोणीही बुडत नाही. हा समुद्र बायबलइतकाच जुना मानला जातो आणि त्याचं आकारमान सतत कमी होत आहे.

01
मृत समुद्राची खोली समुद्रसपाटीपासून 440 मीटर खाली आहे आणि हा जगातील इतर कोणत्याही समुद्रापेक्षा अधिक खोलीवर आहे. तो इस्रायलपासून सुरू होतो आणि जॉर्डनपर्यंत पसरलेला आहे. जरी याला सागर किंवा समुद्र म्हटलं जात असलं तरी तांत्रिकदृष्ट्या तो फक्त एक तलाव आहे. मात्र, हा समुद्र सृष्टीसाठी वरदान आहे. हा जगातील सर्वात खोल मिठाचा तलाव आहे. त्याची खोली 304 मीटर आहे. म्हणजे, तो एखाद्या 80 मजली इमारतीइतका खोल आहे.

02
या समुद्राला मृत समुद्र म्हटलं जात असलं तरी मासे, बेडूक आणि अनेक सागरी किंवा पाण्यात राहणारे प्राणीही त्यात वाढतात. मृत समुद्र इतका खारट कसा आहे हा प्रश्न आहे. हा समुद्र मोठ्या प्रमाणावर जमिनीने वेढलेला आहे. त्याच्या पाण्याचं बाष्पीभवन होते आणि मोठ्या प्रमाणात मीठ साचतं. याचं पाणी इतकं खारट झालं आहे की, त्याची घनता कोणत्याही व्यक्तीला त्यात बुडू देत नाही. लोक त्यात आरामात पडून राहण्याचा आनंद घेतात. या समुद्रात पडल्या-पडल्या आपण पेपरही वाचू शकतो.

03
मृत समुद्राला मुख्यतः जॉर्डन आणि इतर लहान नद्यांचं पाणी जातं. त्यात 11 प्रजातींचे बॅक्टेरिया असतात. याशिवाय मृत समुद्रात मुबलक प्रमाणात खनिजं आढळतात.

04
हे खनिज पदार्थ पर्यावरणासह मिळून आरोग्यासाठी फायदेशीर वातावरण निर्माण करतात. मृत समुद्र त्याच्या चमत्कारांसाठी किमान चौथ्या शतकापासून ओळखला जातो, जेव्हा शिलाजीत त्याच्या पृष्ठभागावरून विशेष बोटींनी काढला गेला आणि इजिप्शियन लोकांना विकला गेला.

05
याच्या पाण्यापासून बनवलेली सौंदर्य उत्पादनं जगभर प्रसिद्ध आहेत. मृत समुद्राच्या आतील आर्द्र माती देखील क्लिओपात्राच्या सौंदर्याच्या रहस्याशी संबंधित आहे. अ‍ॅरिस्टॉटलनेही या महासागराचे भौतिक गुणधर्म सांगितले आहेत. अलीकडच्या काळात हे ठिकाण हेल्थ रिसॉर्ट म्हणून विकसित झालं आहे.

06
मृत समुद्राच्या पाण्यात सामान्य पाण्यापेक्षा 20 पट जास्त ब्रोमिन, 50 पट जास्त मॅग्नेशियम आणि 10 पट जास्त आयोडीन असते. ब्रोमाइन रक्तवाहिन्यांना शांत करते, मॅग्नेशियम त्वचेच्या अ‌ॅलर्जीशी लढा देतं आणि श्वासनलिका साफ करतं. तर, आयोडीन अनेक ग्रंथींची क्रिया वाढवतं. सौंदर्य आणि आरोग्यासाठी मृत समुद्राच्या गुणधर्मांमुळे अनेक कॉस्मेटिक कंपन्या मृत समुद्रातून घेतलेल्या घटकांवर आधारित सौंदर्यप्रसाधनं बनवतात.

07
त्यातील गरम सल्फर प्रवाह आणि चिखल अनेक रोगांच्या उपचारांमध्ये, विशेषत: संधिवात आणि सांध्यांच्या रोगांच्या उपचारांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. मात्र, गेल्या काही वर्षांत मृत समुद्राचा वेग वेगाने आकुंचन पावत आहे. गेल्या 40 वर्षांत येथील पाण्याची पातळी 25 मीटरने कमी झाली आहे. 2050 पर्यंत तो पूर्णपणे नाहीसा होईल, असा अंदाज आहे.

08
जॉर्डन, इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये असलेला मृत समुद्र किंवा डेड सी हे जगातील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. पाण्यात मीठ खूप जास्त आहे. मीठ पाण्याची घनता इतकी वाढवतं की, मृत समुद्रात आपण सहज तरंगू शकतो.

09
तज्ज्ञांच्या मते, नजीकच्या भविष्यात मृत समुद्र पूर्णपणे कोरडा होणार नाही. त्याला जवळच्या ओढ्यांमधून थोडं थोडं पाणी मिळत राहील. पण त्याची पाण्याची पातळी समुद्रसपाटीपासून 417 ऐवजी 700 मीटर खाली जाईल. मग तो समुद्र नसून लहान तलावासारखा दिसेल.

  • FIRST PUBLISHED :
  • मृत समुद्राची खोली समुद्रसपाटीपासून 440 मीटर खाली आहे आणि हा जगातील इतर कोणत्याही समुद्रापेक्षा अधिक खोलीवर आहे. तो इस्रायलपासून सुरू होतो आणि जॉर्डनपर्यंत पसरलेला आहे. जरी याला सागर किंवा समुद्र म्हटलं जात असलं तरी तांत्रिकदृष्ट्या तो फक्त एक तलाव आहे. मात्र, हा समुद्र सृष्टीसाठी वरदान आहे. हा जगातील सर्वात खोल मिठाचा तलाव आहे. त्याची खोली 304 मीटर आहे. म्हणजे, तो एखाद्या 80 मजली इमारतीइतका खोल आहे.

    MORE
    GALLERIES