मराठी बातम्या /बातम्या /विदेश /कॅन्सरवर मात करत अंतराळात जाणार! ही ठरणार सगळ्यात तरुण महिला

कॅन्सरवर मात करत अंतराळात जाणार! ही ठरणार सगळ्यात तरुण महिला

बालपणीच्या कर्करोगावर मात करत तिने स्वत:चं  अंतराळवीर होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे.

बालपणीच्या कर्करोगावर मात करत तिने स्वत:चं अंतराळवीर होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे.

बालपणीच्या कर्करोगावर मात करत तिने स्वत:चं अंतराळवीर होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे.

टेनेसी, 25 फेब्रुवारी: अंतराळात प्रवास करणं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण अंतराळवीरांना (Astronaut) सोडून सामान्य व्यक्तीला ही संधी मिळणे अवघड आहे. पण अमेरिकेतील कॅन्सर पीडित तरुणीला ही संधी मिळणार आहे. लवकरच तिचं अंतराळात जाण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. हेले आर्सेनॉक्स ही अंतराळात जाणारी सर्वात तरुण अमेरिकन व्यक्ती ठरणार आहे. अंतराळवीरांबरोबर ती अंतराळत जाणार असून  लहानपणापासून तिनं हे स्वप्न पाहिलं आहे. परंतु अखेर 29 वर्षांनी तिचं हे स्वप्न पूर्ण होणार आहे. यावर्षीच्या अखेरीस ती अंतराळात जाण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करणार आहे.

हाडांच्या कॅन्सरवर (Bone marrow Cancer) तिने मात केली आहे. तरीदेखील अजूनही तिच्या डाव्या पायामध्ये रॉड बसवण्यात आले आहेत. अमेरिकेतील तरुण उद्योगपती जेरेड आयझॅकमन यांनी स्वतःच्या खर्चाने स्पेस एक्स फाल्कन 9 रॉकेट भाड्याने घेतले आहे. यामधून ते स्वतः अंतराळात जाणार असून त्यांनी आपल्याबरोबर तीन नागरिकांना घेऊन जाण्याचं ठरवलं आहे. यामध्ये  हेले आर्सेनॉक्स हिचादेखील समावेश आहे. याविषयी बोलताना आर्सेनॉक्स हिने म्हटलं कि, ती दुसऱ्यांसाठी प्रेरणा बनणार असून कॅन्सरच्या उपचारातून कशा यापद्धतीने बाहेर यावं हे देखील इतर मुलांना दाखवणार आहे. या मोहिमेमध्ये ज्या चौथ्या व्यक्तीची निवड करण्यात आली होती त्याला Inspiration4 असं नाव दिलं होतं. पण आता त्या व्यक्तीचं नाव समोर आलं असून त्या आर्सेनॉक्स स्वतः आहेत.

टेनेसीमधील मेम्फिस येथील सेंट ज्युड चिल्ड्रन रिसर्च हॉस्पिटलमध्ये या तरुणीवर लहानपणापासून उपचार करण्यात येत होते.  बालरोगांबरोबरच कॅन्सरसाठी देखील हे हॉस्पिटल खास आहे. या अंतराळ मोहिमेतून 200 मिलियन डॉलर उभे राहण्याची आयझॅकमॅन यांना अपेक्षा आहे. एएफपीशी बोलताना आर्सेनेक्सने सांगितलं कि, जानेवारीच्या सुरुवातीला मला हॉस्पिटलमधून फोन आला होता. यामध्ये तुम्हाला अंतराळात जायला आवडेल का? असं मला विचारण्यात आलं. यावर मी तात्काळ होकार दिला. आर्सेनेक्स सध्या याच मेडिकलमध्ये मेडिकल असिस्टंट म्हणून काम करत आहे. लहान असताना तिने टेक्सासच्या ह्युस्टनमधील नासा अंतराळ केंद्राला भेट दिली. "याविषयी बोलताना तिने,नक्कीच मला अंतराळवीर व्हायचे होते."परंतु त्यानंतर काही महिन्यांनंतर मला कॅन्सरचे निदान झाले आणि यामुळे माझे संपूर्ण जग बदलल्याचे म्हटले.

अवश्य वाचा - अपघातात गमावले दोन्ही हात, तरी पोहण्यात पटकावलीत अनेक सुवर्णपदकं

 या मोहिमेमध्ये अंतराळवीर फिट असणं गरजेचं आहे. परंतु आजारावर केलेल्या उपचारांमुळे माझी अनेक ऑपरेशन झाल्याने माझी ही बाजू कमकुवत आहे. यामुळेच मी या मिशनसाठी खूप उत्साही असल्याचं तिनं म्हटलं. नेहमी मोठी स्वप्न बघा असंही तिनं सांगितलं. याचबरोबर अंतराळात जाणारी सर्वात तरुण अमेरिकन ठरणार असल्याचा देखील तिला खूप अभिमान वाटतो. बालपणीच्या कॅन्सरमधून वाचणारी पहिली महिला असल्याने मी या मोहिमेसाठी खूपच उत्साही असल्याचं देखील तिने म्हटलं. या मोहिमेतून मी माझ्या रुग्णांना देखील प्रेरित करणार असून कोणतीही गोष्ट अशक्य नसल्याचं देखील ती दाखवून देणार आहे. यामध्ये आर्सेनेक्स हिच्याबरोबर दोन जागा या लॉटरी आणि हॉस्पिटलच्या देणगीदारांपैकी एकाला दिल्या जाणार आहेत. या मोहिमेमध्ये अंतराळात जाणाऱ्या व्यक्तींसाठी पुढील महिन्यात ट्रेनिंग सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये अंतराळात ज्या जी फोर्सचा त्यांना सामना करावा लागणार आहे त्यासाठी ट्रेनिंग दिली जाणार आहे.

दरम्यान, या मोहिमेसाठी आर्सेनेक्स खूपच उत्सुक असून तिच्या मनामध्ये याविषयी अनेक प्रश्न तयार होत असल्याचं देखील तिनं म्हटलं. नोव्हेंबर 2020 मध्ये अंतराळवीरांना ऑर्बिटमध्ये घेऊन जाणाऱ्या स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमधूनच या यानाचं देखील उड्डाण होणार आहे. याचबरोबर ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर हे यान फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर उतरणार आहे.

First published:
top videos

    Tags: Astronaut, Cancer, Space, United States of America, Youngest woman