मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

अपघातात गमावले दोन्ही हात, तरी पोहण्यात पटकावलीत अनेक सुवर्णपदकं

अपघातात गमावले दोन्ही हात, तरी पोहण्यात पटकावलीत अनेक सुवर्णपदकं

'आता तू काही करू शकणार नाहीस', असं त्याला अपघातानंतर सांगितलं गेलं. पण पिंटूनं मनोमन निश्चय केला. प्रतिकूलतेपुढे अनेकजण खचून जातात. मात्र अनेकांची यशोगाथा प्रतिकूलतेतूनच जास्त झळाळून निघते.

'आता तू काही करू शकणार नाहीस', असं त्याला अपघातानंतर सांगितलं गेलं. पण पिंटूनं मनोमन निश्चय केला. प्रतिकूलतेपुढे अनेकजण खचून जातात. मात्र अनेकांची यशोगाथा प्रतिकूलतेतूनच जास्त झळाळून निघते.

'आता तू काही करू शकणार नाहीस', असं त्याला अपघातानंतर सांगितलं गेलं. पण पिंटूनं मनोमन निश्चय केला. प्रतिकूलतेपुढे अनेकजण खचून जातात. मात्र अनेकांची यशोगाथा प्रतिकूलतेतूनच जास्त झळाळून निघते.

  • Published by:  News18 Desk

जोधपूर, 24 फेब्रुवारी : असं म्हटलं जातं, की आपलं नशीब हे हाताच्या रेषांमध्ये असतं. पण ज्यांना हातच नसतात त्यांचं काय? अशाच एका हात नसलेल्या व्यक्तीनं मिळवलेलं खणखणीत यश मात्र शरीरानं अगदी सुदृढ असलेल्यांनाही प्रेरणा देणारं आहे.

ही गोष्ट आहे जोधपूरच्या (Jodhpur) पिंटू गहलोत (Pintu Gehlot) याची. 21 वर्षांपूर्वी पिंटूनं आपला एक हात गमावला. मात्र इतक्या मोठ्या अपघातानंतरही तो खचला नाही. त्यानं पॅरा स्वीमिंग सुरू केली. एका हातानं पोहून जिद्दीनं अनेक मेडल्सही मिळवले.

अजून वाईट काय, तर दोन वर्षांपूर्वी पिंटूनं आपला दुसरा हातसुद्धा अजून एका अपघातात गमावला(lost both hands in accident). मात्र आश्चर्यकारक पद्धतीनं त्याचा आत्मविश्वास जणू कमी न होता अजूनच वाढला. पिंटू आता मार्च महिन्यात बंगळुरू इथं होणाऱ्या पॅरा स्विमिंग नॅशनल चॅम्पियनशिप (para swimming national championship) स्पर्धेची जोरात तयारी करतो आहे.

पिंटू आता आहे 36 वर्षांचा(36 years old). त्याचा पहिला अपघात झाला 1998 मध्ये. तो बसमध्ये बसून कुठेतरी जात होता. या बसचा अपघात ट्रकसोबत झाला. यात त्याचा एक हात कापला गेला. एक हात घेऊन जगणं सोपं नसतं. लोक त्याला म्हणू लागले, 'आता तू काही करू शकणार नाहीस.' मात्र पिंटूनं काहीतरी करून दाखवायचा मनोमन निश्चय केला.

एका हातानं तो अखंड पोहण्याचा सराव करू लागला(swimming with one hand) . त्यानं लवकरच यात प्राविण्य मिळवलं. अनेकानेक स्पर्धा जिंकल्या. 2016 मध्ये पॅरास्विमिंगची नॅशनल चॅम्पियनशिपही त्यानं जिंकली. आता तो मुलांना पोहायचं प्रशिक्षणही (swimming coach)देतो.

हे सगळं सुरळीत होत असतानाच त्याच्यासोबत दुसरा अपघात झाला. 2019 मध्ये विजेच्या धक्क्यानं (electric shock) पिंटूचा हात जायबंदी झाला आणि कापावा लागला. तरी तो पहाडी आत्मविश्वास घेऊन पुन्हा उभा राहिला. आता केवळ अर्ध्या हाताच्या साहाय्यानं तो पोहू लागला. आजवर पिंटूनं 17 राष्ट्रीय आणि 4 राज्य पातळीच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.

हेही वाचा - डॉक्टरांनी केला चमत्कार आणि पुन्हा धडधडू लागलं मृतांच्या शरीरातील हृदय

आजवर पिंटूनं पोहण्यासह ऍथलेटिक्समध्येही नॅशनल पॅरास्पोर्ट्समध्ये गोल्ड मेडल्स (gold medals) मिळवली आहेत. राजस्थान सरकारनं (Rajasthan government) 2016 नंतर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्यांना थेट सरकारी नोकरी (government job) देण्याची योजना आणली आहे. मात्र पिंटूनं गोल्ड मेडल नॅशनल पॅरा चॅम्पियनशिपमध्ये जिंकल्यानं त्याला या योजनेचा लभ मिळाला नाही. आता त्याला मार्चमध्ये बंगळुरू इथं होणाऱ्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल मिळवत या योजनेसाठी प्रयत्न करायचा आहे.

First published:

Tags: Inspiring story, Success, Success stories