मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

शेतकरी आंदोलनानंतर आता भारतातील कोरोना स्थितीवर ग्रेटा थनबर्गची प्रतिक्रिया; म्हणाली,...

शेतकरी आंदोलनानंतर आता भारतातील कोरोना स्थितीवर ग्रेटा थनबर्गची प्रतिक्रिया; म्हणाली,...

ग्रेटा थनबर्गनं भारतातील वाढत्या कोरोनाच्या (Coronavirus in India) प्रसारावरही भाष्य केलं आहे. तिनं भारतातील कोरोना स्थितीबाबत दुःख व्यक्त केलं आहे.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 25 एप्रिल : स्वीडनची पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग (Greta Thunberg) शेतकरी आंदोलनादरम्यान (Farmer Protest) शेअर केलेल्या टूलकीटमुळे बरीच चर्चेत आली होती. यानंतर आता ग्रेटा थनबर्गनं भारतातील वाढत्या कोरोनाच्या (Coronavirus in India) प्रसारावरही भाष्य केलं आहे. तिनं भारतातील कोरोना स्थितीबाबत दुःख व्यक्त केलं आहे. तिनं लिहिलं आहे, भारतातील कोरोनाची सध्याची स्थिती ऐकून खूप दुःख झालं. तिनं आवाहन करत म्हटलं, की जागतिक समुदायाने पुढे येत आवश्यक सहाय्य त्वरित प्रदान केले पाहिजे.

ग्रेटा थनबर्ग शेतकरी आंदोलनादरम्यान विवादित टूलकीट प्रकाशित केल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. भाजप नेत्यांसह अनेकांनी असा आरोप केला होता, की भारताविरोधात कट रचला जात असून यासाठीच हे टूलकीट प्रसिद्ध व्यक्तींच्या माध्यमातून शेअर केले जात आहेत. यानंतर टूलकीट बनवणाऱ्यांविरोधात दिल्ली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात ग्रेटाचं नावदेखील सामील होतं.

संकटाच्या काळात पाठ फिरवल्यानं अमेरिकेवर दबाव, अखेर भारताच्या मदतीसाठी तयार

ग्रीटा थुनबर्गला हवामान बदलातील संकटाविरूद्धच्या लढ्यात अग्रगण्य वक्ता म्हणून ओळखले जाते. तिने अनेकवेळा आपल्या भाषणांसह लोकांची मने जिंकली आहेत. या व्यतिरिक्त डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या तिच्या ट्विटर वॉरचीही बरीच चर्चा झाली होती. डिसेंबर 2020 मध्ये स्वीडनमधील या 16-वर्षीय पर्यावरण कार्यकर्तीची प्रतिष्ठित टाइम मासिकाने 2019 मध्ये 'पर्सन ऑफ द इयर' म्हणून निवड केली.

भारतातील कोरोना स्थिती -

भारतात मागील चोवीस तासात 349691 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यानंतर देशातील एकूण बाधितांची संख्या 16960172 वर पोहोचली आहे. तर, शनिवारी 2767 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर एकूण मृतांचा आकडा 1,92,311 वर पोहोचला आहे. देशात सध्या 26,82,751 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर, आतापर्यंत 1,40,85,110 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. मागील चोवीस तासात देशात 25,36,612 जणांना कोरोना लस देण्यात आली आहे. यानंतर एकूण लसीकरणाचा आकडा 14,09,16,417 वर पोहोचला आहे.

First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus, Greta Thunberg