Home /News /videsh /

कोरोना संकटाच्या काळात पाठ फिरवल्यानं अमेरिकेवर दबाव, अखेर भारताच्या मदतीसाठी तयार

कोरोना संकटाच्या काळात पाठ फिरवल्यानं अमेरिकेवर दबाव, अखेर भारताच्या मदतीसाठी तयार

लसीसह इतर जीवनरक्षक औषधे भारतात पाठविण्याची मागणी करत विविध खासदार आणि सुप्रसिद्ध भारतीय-अमेरिकन लोकांनी बायडन प्रशासनावर दबाव टाकल्यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांनी भारताला सहाय्य (America working closely with India to deal with corona crisis) करण्याची तयारी दर्शवली आहे.

पुढे वाचा ...
    वॉश्गिंटन 25 एप्रिल : अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन म्हणाले, की कोरोना विषाणूच्या (Coronavirus Pandemic) विरूद्ध लढा देण्यासाठी अमेरिका भारताला अतिरिक्त सहाय्य करेल. यासह अमेरिकन प्रशासन भारत सरकारसोबत मिळून काम करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. लसीसह इतर जीवनरक्षक औषधे भारतात पाठविण्याची मागणी करत विविध खासदार आणि सुप्रसिद्ध भारतीय-अमेरिकन लोकांनी बायडन प्रशासनावर दबाव टाकल्यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांनी ही माहिती दिली आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकेन म्हणाले, की कोरोनाच्या या भयंकर प्रकोपादरम्यान भारतीय लोकांसाठी आम्हाला मनापासून वाईट वाटत आहे. आम्ही भारत सरकारमधील आमच्या सहकाऱ्यांसोबत मिळून काम करत (America Working Closely With India to Deal With Corona Crisis)आहोत. लवकरच आम्ही भारतातील नागरिकांसाठी आणि तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त सहाय्य पाठवणार आहे. 1 मेपासून 18+ सगळ्यांना मिळणार लस, केंद्राच्या राज्यांना महत्त्वाच्या सूचना यासोबतच व्हाईट हाऊसचे प्रेस सचिव जेन साकी यांनी शुक्रवारी सांगितले, की या कोरोना महामारीचा सामना करणाऱ्या भारतीय जनतेबद्दल अमेरिकेला सहानुभूती आहे. साकी आपल्या दैनंदिन पत्रकार परिषदेत म्हणाले की, 'आम्ही या संकटाचा सामना करण्यासाठीचा मार्ग ओळखण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांसोबत, नेत्यांसोबत आणि तज्ज्ञांसोबत चर्चा करत असून जवळून काम करत आहोत. यूएस चेंबर्स ऑफ कॉमर्समध्ये आंतरराष्ट्रीय प्रकरणांचे प्रमुख आणि कार्यकारी उपाध्यक्ष मायरोन ब्रिलिएंट म्हणाले, की जगभरात कोरोना महामारीचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. अशात सर्वाधिक प्रभावित भारत आणि ब्राझीलला जीवनरक्षक औषधं आणि लसीचे डोस पाठवण्यासाठी अमेरिका तयार आहे. अमेरिकेजवळ अॅस्ट्राजेनेका लसीचे 3.5 ते चार कोटी अतिरिक्त डोस आहेत. त्याचा कधीच वापर झाला नाही. आम्ही या लसी भारतात पोहचू शकतो का? त्यामुळे भारताला मदतच मिळेल, असं लोक आरोग्य विशेषज्ञ आशिष झा यांनी म्हटलं आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Coronavirus, India america, World After Corona

    पुढील बातम्या