Home /News /videsh /

निर्दय! पती आणि पत्नी झाले कोरोना पॉझिटीव्ह, सरकारने मारले 12 पाळीव कुत्रे

निर्दय! पती आणि पत्नी झाले कोरोना पॉझिटीव्ह, सरकारने मारले 12 पाळीव कुत्रे

कोरोना झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये (Government kills 12 pet dogs of a couple after getting corona positive) दाखल झालेल्या एका कुटुंबाच्या घरातील 12 पाळीव कुत्रे सरकारनं अमानूषपणे मारून टाकल्याची घटना समोर आली आहे.

    हॅनॉई, 15 ऑक्टोबर : कोरोना झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये (Government kills 12 pet dogs of a couple after getting corona positive) दाखल झालेल्या एका कुटुंबाच्या घरातील 12 पाळीव कुत्रे सरकारनं अमानूषपणे मारून टाकल्याची घटना समोर आली आहे. पती आणि पत्नी दोघेही कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं  (Couple admitted to hospital) आढळून आल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान जेव्हा त्यांना आपल्या पाळीव कुत्र्यांच्या हत्येची (Couple into deep sorrow after knowing the fact) बातमी समजली, तेव्हा ते धाय मोकलून रडू लागले. कोरोनाची भीती व्हिएतनाममधील फम मिन्ह हंग आणि त्यांची पत्नी न्गुयेन यांना कोरोना झाल्याचं लक्षात आलं. त्यांना व्हिएतनाममध्येच एका नातेवाईकाकडं जायचं होतं. प्रवासाला परवानगी मिळण्यापूर्वी कोरोनाची चाचणी करणं बंधनकारक असल्यामुळे त्यांनी टेस्ट केली. त्यामध्ये ते कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं दिसून आलं. त्यामुळे तातडीनं दोघांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. कुत्र्यांची केली हत्या या दोघांनी 12 कुत्रे पाळले होते. या दोघांना जर कोरोना झाला आहे, तर त्यांच्या 12 कुत्र्यांनाही कोरोना झाला असेल, या समजुतीनं सरकारनं त्यांना न कळवताच सर्वच्या सर्व कुत्र्यांची हत्या केली. कुत्र्यांमुळे कोरोना पसरू नये आणि इतरांना त्रास होऊ नये, या उद्देशानं आपण कुत्र्यांना मारण्याचा निर्णय़ घेतल्याचं सरकारनं सांगितलं. ही बातमी जेव्हा दोघांना समजली, तेव्हा हॉस्पिटलमध्ये दोघांनीही हंबरडा फोडला. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे अश्रू थांबायला तयार नाहीत. रडून रडून त्यांची वाईट अवस्था झाली आहे. पहिले दोन दिवस सुधारत असणारी त्यांची तब्येत या घटनेमुळे अधिकच खालावू लागली. हे वाचा - 'निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान' संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य सरकारविरुद्ध आवाज कुत्र्यांना कोरोना होतो का आणि त्यांच्यामुळे तो पसरतो का, याची कुठलीही शास्त्रीय माहिती समोर आली नसताना कुठल्या आधारावर आपल्या कुत्र्यांची हत्या करण्यात आली, असा सवाल या जोडप्यानं उपस्थित केला आहे. मूल होत नसल्यामुळे या दोघांनी कुत्रे पाळले होते आणि त्यांचा मुलांसारखा ते सांभाळ करत होते. मात्र सरकारनेच त्यांची हत्या केल्यामुळे आता दाद तरी कुणाकडे मागायची, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Coronavirus, Dog

    पुढील बातम्या