अंतानानारिवो, 6 नोव्हेंबर : आफ्रिकेमधील एक देश मादागास्कर (Madagascar) येथे जर्मनीतील संशोधकांना तब्बल 107 वर्षानंतर एक अनोखा सरडा (Chameleon) सापडला आहे. urcifer voeltzkowi असं या अनोख्या सरड्याचं नाव आहे. 1913 मध्ये हा सरडा पाहिल्याची नोंद होती, त्यानंतर हा कधी दिसला नव्हता. मादागास्करची घनदाट जंगलं ही या सरड्यांचा नैसर्गिक अधिवास आहे.
सरड्याची ही प्रजाती पावसाळ्यात पिल्लांना जन्म देते आणि ती खूप वेगाने वाढतात. या सरड्यामध्ये खूप वेगवेगळे रंगाचे पॅटर्न दिसतात. विशेषतः मादींमध्ये नर सरडा समोर असताना, गर्भावस्थेत असताना किंवा तणावामध्ये असताना अनोखे रंगांचे पॅटर्न दिसू लागतात.
भारतात सामान्यपणे आढळणारा सरडा हा रंग बदलू शकत नाही, पण शॅमेलिऑन प्रजातीतील सरडा रंग बदलू शकतो. हा सापडलेला सरडा याच प्रजातीतील आहे. शॅमेलिऑन मातीवर असेल तर त्याची कातडी मातीच्या रंगाची होते. झाडाच्या बुंध्यावर तो त्या रंगाचा होतो. शत्रूंपासून बचाव करण्यासाठी निसर्गाने त्याला ही क्षमता दिली आहे.
सॅलमंड्रा जर्मन जर्नलमध्ये या सरड्याबद्दल फ्रॅंक ग्ला यांचा एक शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. जर्मनीतील संशोधकांची एक टीम आफ्रिकेतील मादागास्कर या देशात गेली होती. यावेळी त्यांनी हा अनोखा सरडा पाहिला. त्यांनी आपल्या अहवालात असं म्हटलं आहे की, आमचं संशोधन 25 मार्च ते 3 एप्रिल 2018 दरम्यान झालं होतं. आमची टीम ईशान्य मादागास्करमधील महाजंगा भागातील जंगलांमध्ये गेली होती. या सरड्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर अतिशय व्हायरल होत आहे.
गेल्या अनेक दशकांपासून हा सरडा बेपत्ता होता -
या प्रजातीच्या सरड्यांचं आयुष्य खूपच कमी असतं आणि म्हणूनच गेली अनेक दशकं हा सरडा बेपत्ता झाला होता, म्हणजे माणसाला आढळला नव्हता. याचं एक कारण असं आहे की, पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीमुळे मादागास्करच्या या भागात जाणं शक्य होत नाही. येथील अनेक भागांचे रस्ते बंद होतात आणि पुढे जायला मार्ग मिळत नाही.
FOUND: The Voeltzkow’s Chameleon had been lost to science since 1913...but no longer! An expedition team rediscovered the colorful species during an expedition in Madagascar. This is the 6th of our most wanted lost species found! https://t.co/7ZK2AGV6aY (Video: Frank Glaw) pic.twitter.com/wYqwN5UlX4
— Global Wildlife Conservation (@Global_Wildlife) October 30, 2020
जगातील सर्वाधिक दुर्मिळ झालेल्या प्रजातींमध्ये या सरड्याची सहावी प्रजाती आहे आणि आता त्याचा शोध लागला आहे. हा शोध प्राणी विज्ञानाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. ही प्रजाती दिसल्यामुळे त्या सरड्यांबाबत पुढचा अभ्यास शास्रज्ञांना करता येऊ शकेल.