मराठी बातम्या /बातम्या /विदेश /Body Piercing: संपूर्ण शरीरावर पिअर्सिंग केलेल्या 'या' व्यक्तीनं केला त्याच्या लैंगिक जीवनाविषयी खुलासा

Body Piercing: संपूर्ण शरीरावर पिअर्सिंग केलेल्या 'या' व्यक्तीनं केला त्याच्या लैंगिक जीवनाविषयी खुलासा

File Photo

File Photo

Piercings on the body: संपूर्ण शरीरावर अगदी प्रायव्हेट पार्टवर (Private Part) पिअर्सिंग केल्यानं लैंगिक जीवनावर (Sex Life) काही परिणाम होतो का असा सवाल रॉल्फ बुकोल्ज यांना विचारला जात आहे.

    नवी दिल्ली, 21 डिसेंबर : काही लोक लक्षवेधी ठरण्यासाठी, चर्चेत राहण्यासाठी काहीतरी हटके करावं या दृष्टिकोनातून नवनवीन गोष्टी करत असतात. यासाठी ते टॅटू काढणं, पिअर्सिंग (Piercings), बॉडी मॉडिफिकेशन (Body Modification) आदी गोष्टींचा अवलंब करतात. जर्मनीतील (Germany) एका व्यक्तीला अशाच प्रकारचा विचित्र छंद आहे. या व्यक्तीनं संपूर्ण शरीरावर पिअर्सिंग करून घेतलं आहे. रॉल्फ बुकोल्ज (Rolf Buchholz) असं या जर्मन व्यक्तीचं नाव असून, त्याच्या या अनोख्या छंदाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली आहे.

    सध्या रॉल्फ बुकोल्ज एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. संपूर्ण शरीरावर अगदी प्रायव्हेट पार्टवर (Private Part) पिअर्सिंग  केल्यानं लैंगिक जीवनावर (Sex Life) काही परिणाम होतो का असा सवाल रॉल्फ बुकोल्ज यांना विचारला जात आहे. त्यावर रॉल्फ बुकोल्ज यांनी उत्तर दिलं आहे. याबाबत झी न्यूज हिंदीने वृत्त दिलं आहे.

    वाचा : 66 वर्षांच्या आजोबांना हवी परफेक्ट जोडीदार; तिच्यासाठी रस्त्यावरच लावलं होर्डिंग

    'द सन'च्या वृत्तानुसार, रॉल्फ बुल्कोज यांनी त्यांच्या शरीराच्या प्रत्येक भागावर पिअर्सिंग केलेलं आहे. इतकचं नाहीतर त्यांच्या प्रायव्हेट पार्टवर 278 पिअर्सिंग केली आहेत. जर्मनीतील एका टेलिकॉम कंपनीत काम करणाऱ्या 61 वर्षीय रॉल्फ यांनी केवळ पिअर्सिंगच नाहीतर शरीरामध्येही अनेक प्रकारचे बदल केले आहेत. त्यांच्या शरीरावर अनेक प्रकारचे टॅटू आहेत. तसेच डोक्यावर दोन शिंगही इम्प्लांट केली आहेत. वयाच्या 40 व्या वर्षी रॉल्फ यांना बॉडी मॉडिफिकेशची आवड निर्माण झाली. याचदरम्यान त्यांनी पहिल्यांदा पिअर्सिंग करून घेतलं. आता त्यांच्या संपूर्ण शरीरावर पिअर्सिंग आहे. विशेष म्हणजे त्यांच्या ओठांवर सुमारे 94 पिअर्सिंग आहेत आणि 90 टक्के शरीरावर टॅटू गोंदले आहेत.

    वाचा : कोरोनाचा स्पर्म काऊंटवर होतोय परिणाम? संशोधकांनी केला हैराण करणारा खुलासा

    अतिप्रमाणात पिअर्सिंग केलेल्या रॉल्फ यांना एअरपोर्टवर (Air Port) अनेक अडचणींचा वारंवार सामना करावा लागतो. अर्थात याला दोन कारणं आहेत. यातील पहिलं कारण म्हणजे बहुतांश देशांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात बॉडी मॉडिफिकेशन केलेली व्यक्ती आढळून येत नाही आणि दुसरं कारण म्हणजे एअरपोर्टवर मेटल डिटेक्टरमधून जाताना सायरन असा काही वाजतो, की एखाद्याला वाटतं ही व्यक्ती हत्यारं घेऊन जात आहे. `एकदा तर मी काळी जादू (Black Magic) करणारी व्यक्ती वाटल्यानं मला दुबई एअरपोर्टवर अधिकाऱ्यांनी रोखलं होतं`, असं रॉल्फ यांनी सांगितलं.

    शरीराच्या प्रत्येक भागावर पिअर्सिंग असल्यानं रॉल्फचं लैंगिक जीवन नेमकं कसं असेल, याची चर्चा वारंवार होते. त्याबाबत बोलताना रॉल्फ यांनी सांगितलं की "मेटल पिअर्सिंग ही माझ्यासाठी समस्या नाही. माझं लैंगिक जीवन पूर्वीसारखंचं आहे. मी बाहेरून बदललो असलो तरी आतून बदललो नाही. माझ्या लैंगिक जीवनावर पिअर्सिंगमुळं कोणाताही परिणाम झालेला नाही".

    First published:
    top videos

      Tags: Germany, Lifestyle