मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Geomagnetic Storm: भूचुंबकीय वादळ प्रंचड वेगाने पृथ्वीवर धडकण्याची शक्यता, जगभर अंधार पसरण्याची शक्यता

Geomagnetic Storm: भूचुंबकीय वादळ प्रंचड वेगाने पृथ्वीवर धडकण्याची शक्यता, जगभर अंधार पसरण्याची शक्यता

सौर भूचुंबकीय वादळ म्हणजे सूर्यापासून मोठ्या प्रमाणात कोरोनल मास इजेक्शन होणार आहे. जेव्हा हे घडते, तेव्हा उच्च तीव्रतेची ऊर्जा पृथ्वी आणि इतर काही ग्रहांकडे सोडली जाईल. पृथ्वीवर आदळल्यानंतर हे वादळ भयंकर स्वरूप धारण करू शकते.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 14 एप्रिल : भूचुंबकीय वादळ (Geomagnetic Storm) आज पृथ्वीवर धडकण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. यामुळे संपूर्ण जगात अंधार पसरू शकतो. नॅशनल अॅरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) आणि नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन (NOAA) यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, पृथ्वीवर कोरोनल मास इजेक्शन (CME) आदळण्याची शक्यता आहे. यामुळे भूचुंबकीय वादळे होऊ शकतात.

पृथ्वीवर आदळणाऱ्या भूचुंबकीय वादळामुळे विद्युत ग्रीड आणि अशा इतर वस्तूंचे नुकसान होऊ शकते. या वादळाचा वेग 429 ते 575 किमी प्रति सेकंद असू शकतो. शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की सूर्याच्या अॅक्टिव्हिटीमध्ये बदल झाला आहे.

सौर भूचुंबकीय वादळ म्हणजे सूर्यापासून मोठ्या प्रमाणात कोरोनल मास इजेक्शन होणार आहे. जेव्हा हे घडते, तेव्हा उच्च तीव्रतेची ऊर्जा पृथ्वी आणि इतर काही ग्रहांकडे सोडली जाईल. पृथ्वीवर आदळल्यानंतर हे वादळ भयंकर स्वरूप धारण करू शकते, असे नासाने म्हटले आहे. याचे कारण सौर वाऱ्याच्या प्रवाहाचा वेग जास्त आहे.

श्रीलंकेच्या स्थितीवरून समजून घ्या, देश दिवाळखोर कसे होतात? आणखी काही देश या मार्गावर

सेंटर ऑफ एक्सलन्स इन स्पेस सायन्स इंडिया (CESSI) ने याबाबत एक ट्वीट केले आहे. "आमचे मॉडेल फिटकडून असे संकेत मिळत आहेत की 14 एप्रिल रोजी अर्थ इम्पॅक्टची जास्त संभाव्यता आहे. जर भूचुंबकीय वादळ पृथ्वीवर आदळले तर पृथ्वीवरील विद्युत ग्रीड आणि इतर गोष्टींचे नुकसान होऊ शकते. यामुळे वीज खंडित होऊ शकते, ज्यामुळे अंधार होऊ शकतो. तसेच अनेक विद्युत कामे बंद पडू शकतात.

मोठी बातमी! तुम्हाला कोरोना झालाय की नॉर्मल फ्लू? ही नवीन टेक्नॉलॉजी देईल क्षणात उत्तर

NOAA ने म्हटले आहे की जास्त उंचीवर त्याचा जास्त परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रेडिओ सिग्नलमध्येही अडथळे येऊ शकतात. मध्यम-उंचीच्या ठिकाणी प्रभाव कमी असेल असे म्हटले आहे. मात्र, वीजपुरवठा खंडित होऊ शकतो.

गेल्या वर्षी 13 जुलै रोजी सौर वादळही पृथ्वीवर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याबरोबरच दळणवळणाच्या पायाभूत सुविधांचेही नुकसान होण्याची भीती त्यावेळी शास्त्रज्ञांनी व्यक्त केली होती. परंतु, असे झाले नाही. आपल्या सूर्यमालेची रचना अतिशय गुंतागुंतीची आहे. शास्त्रज्ञांनाही ते नीट समजून घेणे अवघड जाते.

First published:

Tags: Earth, Nasa, Storm