Home /News /technology /

मोठी बातमी! तुम्हाला कोरोना झालाय की नॉर्मल फ्लू? ही नवीन टेक्नॉलॉजी देईल क्षणात उत्तर

मोठी बातमी! तुम्हाला कोरोना झालाय की नॉर्मल फ्लू? ही नवीन टेक्नॉलॉजी देईल क्षणात उत्तर

या दोन्ही आजारांची लक्षणं समान असल्याने जॉर्ज मेसन युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ हेल्थ अ‍ॅंड ह्युमन सर्व्हिसेसच्या तज्ज्ञांनी एक विशेष अल्गोरिदम (Algorithm) तयार केला आहे.

  मुंबई, 13 एप्रिल:   माणसाचं फ्लूशी (Flu) असलेलं नातं शेकडो वर्षं जुनं आहे. हा विषाणू (Virus) मानवाच्या आधीपासून पृथ्वीवर अस्तित्वात आहे, असं शास्त्रज्ञांचं मत आहे. तथापि 1918-19 मध्ये पसरलेल्या एन्फ्लुएंझाच्या (Influenza) साथीपासून फ्लूविषयीची माहिती समोर आल्याचा तपशील इतिहासात आढळतो किंवा आपण हा आजार ओळखला आणि त्याला नाव दिलं, असंदेखील म्हणता येईल. दुसरीकडे पृथ्वीवरचं मानवाचं अस्तित्व आणि विकास समजून घेतला, तर भारतातली योगासनांची (Yoga) परंपरा हजारो वर्षं जुनी आहे, ही बाबदेखील लक्षात घेण्यासारखी आहे. वेदांमध्येही योगाचा उल्लेख आहे. योग हा पूर्णपणे श्वासोच्छवासाचा चढ-उतार आणि तो बाहेर टाकणं-आत घेणं यांवर अवलंबून आहे. एकूणच प्राणायाम (Pranayama) हा योगाचा आधार आहे. त्याच वेळी फ्लूसारखा आजार, जो ज्ञात इतिहासानुसार 100 वर्षांपासून आपल्यासोबत आहे आणि तो वारंवार महामारीच्या (Pandemic) रूपाने वेगवेगळ्या स्वरूपात पुढे येतो, त्याच्याशी संबंधित विषाणू सर्वप्रथम आपला श्वास आणि फुफ्फुसांना इजा पोहोचवतो. या दोन्ही गोष्टींकडे एकत्रित पाहिलं तर हे नाकारता येणार नाही, की कदाचित याच कारणामुळे भारतात प्राणायामाला इतकं महत्त्व दिलं जातं. प्राणायाम संसर्गापासून संरक्षण देऊ शकतो. परंतु, आजार झाला तर त्यावर निश्चितच उपचार आवश्यक आहेत. उपचारासाठी आजाराचं नेमकं निदान होणं आवश्यक आहे. कोरोना आल्यानंतर फ्लूदेखील अनेक वेळा वेगवगळ्या रूपात दाखल झाला आहे. हा विषाणू हजारो वेळा म्युटेट (Mutate) झाला आहे. विशेष म्हणजे, फ्लू असो की कोरोना, प्राथमिक स्तरावर दोन्हींची लक्षणं (Symptoms) सारखीच असतात. याच कारणामुळे सुरुवातीला कोरोना हा सामान्य फ्लू असावा, असा समज झाला. कोरोना झाल्यानंतरही फ्लू झाला असं समजून अनेकांनी तपासणीकडे पाठ फिरवली. कोरोनाची साथ येऊन आता दोन वर्षं उलटून गेली आहेत; पण रुग्णाला कोरोना झाला की फ्लू हे सहज कसं ओळखायचं, हा प्रश्न अद्यापही कायम आहे. त्यात कुठे फ्लूची साथ आली असेल तर अडचण अधिकच वाढताना दिसते. या 6 गंभीर आजारांची लक्षणं आपल्या डोळ्यात दिसतात; वेळीच ओळखली तर टळेल धोका
  कोरोना विरुद्ध फ्लू अमेरिकेतलं रोगनियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र अर्थात `सीडीसी`च्या (CDC) म्हणण्यानुसार, हे दोन्ही आजार श्वसन संस्थेशी निगडित आहेत. त्यामुळे संभ्रम निर्माण होतो. परंतु, फ्लूसाठी एन्फ्लुएंझा हा विषाणू कारणीभूत ठरतो, तर कोरोना संसर्गासाठी SARS-CoV-2 हा कारणीभूत ठरतो. कोरोना (Corona) फ्लूच्या तुलनेत वेगानं फैलावतो. अशा परिस्थितीत योग्य उपचारासाठी आजाराचं अचूक निदान करण्याच्या अनुषंगाने शास्त्रज्ञांना अलीकडेच यश मिळालं आहे. या दोन्ही आजारांची लक्षणं समान असल्याने जॉर्ज मेसन युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ हेल्थ अ‍ॅंड ह्युमन सर्व्हिसेसच्या तज्ज्ञांनी एक विशेष अल्गोरिदम (Algorithm) तयार केला आहे. या अल्गोरिदममुळे फ्लूच्या हंगामात कोविडबद्दल (Covid) माहिती मिळू शकणार आहे. या अल्गोरिदमद्वारे विशिष्ट असं लक्षण शोधलं जाईल, जे कोविड असण्याची अधिक शक्यता दर्शवतं. यामध्ये तपासणीपूर्वी हवामानाच्या (Weather) आधारे रुग्णाला नेमका कोणता आजार झाला आहे, याचा अंदाज लावता येणार आहे. हंगाम नेमक्या कोणत्या आजाराचा आहे, हे जाणून घेण्यासाठी त्यात हवामान हा घटक आधारभूत ठरणार आहे.
  यामुळे कोविडच्या रुग्णांची माहिती मिळण्यास मोठी मदत होईल. जेव्हा चाचण्यांची उपलब्धता मर्यादित असते किंवा रिपोर्ट येण्यास उशीर होतो, तेव्हा समुदाय स्तरावर काम करणारे डॉक्टर्स लॅबोरेटरीच्या रिपोर्टच्या तुलनेत समुदायातल्या लक्षणांवर आधारित उपचार करू शकतात. भारतात आता बूस्टर डोससाठी (Booster Dose) पैसे द्यावे लागणार आहेत. तसंच सरकारने मोफत चाचणी मर्यादित केली आहे. त्याबरोबर अनेक देशांच्या सरकारने 1 एप्रिलपासून मोफत चाचण्या (Testing) पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक जण चाचण्यांपासून दूर राहतील आणि ही परिस्थिती पुन्हा महामारीला आमंत्रण देऊ शकते. परंतु, या अल्गोरिदममधून माहिती मिळाल्यानंतर समुदाय स्तरावर लक्षणं तपासल्यावर डॉक्टर रुग्णाला खबरदारी म्हणून घरीच राहण्याचा सल्ला देऊ शकतात. सावधान! कोल्ड-ड्रिंक्सच्या बाटलीमध्ये पाणी साठवणं ठरू शकतं धोकादायक
  अल्गोरिदममुळे होईल मदत नव्या संशोधनानुसार, समुदाय आधारित (Community based Heath Services) आरोग्य सेवा देणाऱ्यांनी कोविडच्या अनुषंगाने माहिती होण्यासाठी लक्षणं आणि संकेतांकडे लक्ष दिलं पाहिजे. उदाहरणार्थ, फ्लूची साथ नसेल तर ताप (Fever) हे कोरोनाचं मुख्य लक्षण असू शकतं; मात्र फ्लूच्या साथीत ताप आला तर याचा अर्थ कोविड आहे, असा होत नाही, असंही अभ्यासात नमूद करण्यात आलं आहे. हा अल्गोरिदम वेगवेगळ्या वयोगटांसाठी आणि लिंगांसाठी वेगळ्या पद्धतीनं काम करतो.
  तथापि, संशोधकांच्या म्हणण्यानुसार, हा अल्गोरिदम खूप गुंतागुंतीचा आहे. त्यामुळे कोणत्याही डॉक्टरने याच्या आधारे मूल्यांकन करावं, अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. त्यामुळे आता संशोधक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (Artificial intelligence) समावेश असलेल्या वेबआधारित कॅल्क्युलेटरची निर्मिती करणार आहेत. त्यामुळे हे काम अधिक सोपं होईल.
  First published:

  Tags: Corona, Technology

  पुढील बातम्या