पॅरिस, 23 जानेवारी: अटलांटिक समुद्रातून (
Atlantic Sea) स्वतःच्या बोटीनं प्रवास करण्याचं चॅलेंज (
Challenge) घेतलेल्या विक्रमवीर जीन जॅक्वेस (
Jean Jacques) या रोवरचा (
Rover) समुद्रातच मृत्यू (
Death in the sea) झाला. आयुष्यभर समुद्राचं आकर्षण असणारा आणि समुद्रातून अनेक धाडसी मोहिमा फत्ते करण्याचा अनुभव असणारा हा अवलिया पंच्याहत्तरी ओलांडल्यानंतरही समुद्रसफारीवर निघाला होता. मात्र यावेळी जीनपेक्षा समुद्र हा अधिक शक्तीशाली निघाला, अशी प्रतिक्रिया जीन जॅक्वेस यांच्या टीमनं दिली आहे.
समुद्राला दिले आव्हान
सतत समुद्रात जाणं आणि समुद्रातून स्वतः बोट हाकत एका भागातून दुसऱ्या भागात पोहोचण्याचं चॅलेंज ते घेत असत आणि ते पारही करत असत. 2019 सालीही त्यांनी समुद्राचा आव्हानात्मक टप्पा पार करून दाखवण्याचा विक्रम रचला होता. गेल्या वर्षीच जीन यांनी वयाची 75 वर्षं पूर्ण केली होती. मात्र कितीही वय झालं तरी त्याचा आपल्या छंदांवर आणि आयुष्यातील उत्साहावर फरक पडू शकत नसल्याचं त्यांचं ठाम मत होतं. त्यामुळे आयुष्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत आपण समुद्रसफारी करतच राहण्याचा निर्धार त्यांनी पंच्याहत्तरीला केला होता.
आखली अवघड मोहीम
मिलिट्रीमध्ये पॅराट्रूपर पदावरून निवृत्त झालेल्या जीन यांच्या मते वय हा केवळ एक आकडा होता. त्यांच्या फेसबुक वॉलवरही ते नेहमी हेच लिहित असत आणि अनेकांना त्यांचे छंद जोपासण्यासाठी प्रवृत्त करत असत. सध्या ते अशाच एका आव्हानात्मक समुद्र सफारीसाठी निघाले होते. नॉर्थ अटलांटिक समुद्रात मोठ्या आव्हानात्मक सफरी पार करत असतानाही ते कुटुंबीयांच्या अनेकदा संपर्कात असत आणि सॅटेलाईट फोनवरून बोलतही असत. मात्र गेले काही दिवस त्यांच्याकडून कुठलाच संपर्क न झाल्यामुळे कुटुंबीयांना काळजी वाटू लागली होती.
हे वाचा-
10 लाख डॉलर्स जिंकण्याची संधी, मंगळ-चंद्र मोहिमेसाठी NASAचं Food Challenge
जीन यांचा मृतदेह
जीन यांचा संपर्क तुटला असंच सुरुवातीला सर्वांना वाटत होतं. मात्र त्यानंतर त्यांचा समुद्रावर तरंगणारा मृतदेह आढळला आणि जीन हे उग्र समुद्रात बळी पडल्याचं सिद्ध झालं. आयुष्यभर समुद्रातून वेगवेगळी साहसं करणाऱ्या आणि समुद्र प्रवासाचे विक्रम रचणाऱ्या जीन यांना मृत्यूदेखील समुद्रात सफारी करतानाच आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.