Euro 2020 या फुटबॉल स्पर्धेत इंग्लंडला (England v Denmark match in Wembley) इटलीशी टक्कर द्यावी लागणार आहे. बुधवारी डेन्मार्कविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडन चांगली खेळी खेळली. डेन्मार्कचा 2-1 असा पराभव करुन फायनलमध्ये प्रवेश केला. अतिरिक्त वेळेच्या 104 व्या मिनिटाला इंग्लंडचा कर्णधार हेरी केन याने केलेला गोल महत्त्वाचा ठरला होता. यादरम्यान इंग्लंडला पेनल्टी किकदेखील मिळाली होती, त्यावेळी प्रेक्षकातून डेन्मार्कच्या गोलरक्षकाच्या डोळ्यावर लेझर लाइट मारण्याचादेखील प्रयत्न करण्यात आला होता. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. दरम्यान इंग्लंडच्या विजयानिमित्ताने रात्रभर येथील रस्त्यांवर उत्साहाचं वातावरण होतं. मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले होते. ज्यांना शक्य झालं त्यांनी अगदी स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहिला. मात्र एका 36 वर्षांच्या महिलेला हा सामना महागात पडला आहे. इंग्लंडचा कर्णधार हेरी केननंच्या विजयी गोलनंतर निना फारुकी (Nina Farooqi) ही 36 वर्षीय महिला जल्लोष करताना टीव्हीवर दिसली. दुसऱ्या दिवशी मात्र तिला याचा मोठी फटका सहन करावा लागला.
हे ही वाचा- IND vs SL : श्रीलंकेत या खेळाडूंनी जिंकलं द्रविडचं मन, चौघांची धमाकेदार कामगिरी या आनंदाच्या 24 तासांच्या आता तिचा फोन खणखणला. फोनवर दुसऱ्या बाजूला तिचे बॉस होते. त्यांनी तिला कामावरुन काढून टाकलं होतं. त्याचं झालं असं की निनाच्या मैत्रिणीला शेवटच्या मिनिटाला सामन्याची तिकीट मिळाली होती. ऐनवेळी सुट्टी मागितली तर मिळणार नाही या भीतीने निनाने बॉसला तब्येत बरी नसल्याचं खोटं सांगितलं होतं. आता टीव्हीवरच निनाचा चेहरा दिसल्यानं सर्व गुपित उघड झालं.
वृत्त माध्यमाशी बोलतावा निना म्हणाली की, सध्या संमिश्र भावना आहे. इंग्लंड जिंकल्याचा आनंद तर आहे पण नोकरी गेल्याचं दु:खही आहे. फुटबॉलचा सामना पाहण्यासाठी मी काहीही करू शकते, ही मैत्रिणीला माहिती होतं. शेवटी आम्ही जायचं ठरवलं. 1996 मध्ये जेव्हा इंग्लंडचा पराभव झाला तो दिवस मला आजही लक्षात आहे. जेव्हा गॅरेथ साऊथगेट यांनी पॅनल्टी किक मिस केली होती, त्यानंतर इंग्लंडचा पराभव झाला होता. आणि ते पाहून मी आईच्या कुशीत खूप रडले होते.