Home /News /videsh /

कोरोनाची आता खिशालाही झळ, चीनमधून भारतात येणाऱ्या औषधांच्या किंमती वाढणार

कोरोनाची आता खिशालाही झळ, चीनमधून भारतात येणाऱ्या औषधांच्या किंमती वाढणार

आता कोरोनाव्हायरसमुळेचीनमधून भारतामध्ये आयात केल्या जाणाऱ्या औषधांची किंमत वाढण्याची शक्यता आहे.

    चीन, 18 फेब्रुवारी : चीनमधून सुरू झालेला कोरोनाव्हायरस आता जगभरात आपले हात पसरू लागला आहे. इतर क्षेत्रांसोबतच कोरोनाचा सर्वाधिक परिणाम होतोय तो अर्थव्यवस्थेवर. चीनमध्ये पूर्णपणे शटडाऊन करण्यात आल्याने चीनमधील अनेक व्यवसायही बंद पडले आहेत. आयात-निर्यातीवरही याचा परिणाम झाला आहे. भारत चीनमधून अनेक गोष्टींची आयात करतो. त्यातीलच एक महत्वाचं म्हणजे औषधांची केली जाणारी आयात. चीनमध्ये शटडाऊन घोषित कऱण्यात आल्याने औषधांची निर्यातही थांबण्यात आली आहेत. औषधांसाठी लागणाऱ्या अधिकाधिक वस्तू चीनमधून आयात केल्या जातात. आता कोरोनाव्हायरसमुळे औषधांची किंमत वाढण्याची शक्यता आहे. भारतात आयात केल्या जास्तीत जास्सत वस्तू या चीनमधून आयात केल्या जातात. भारतात संपुर्ण देशातून केल्या जाणाऱ्या आयातीमधील 43 टक्के आयात ही एकट्या चीनमधून केली जाते. भारत 65 ते 70 टक्के फार्मासिटिकल वस्तू, 90 टक्के मोबाईल फोनचे पार्ट चीनमधून आयात करतो. भारत चीनमधून 45 टक्के इलेक्ट्रॉनिकल वस्तू आयत करतो. यामध्ये मशिन, कार्बनिक रसायन, आणि 25 टक्के ऑटोमोटीव पार्टसचा समावेश आहे. खळबळजनक खुलासा, चीनच्या लॅबमध्ये एका चुकीमुळे तयार झाला Coronavirus? या कोरोना व्हायरसचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर फारसा पडलेला नाही. मात्र सीआयआय ( कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री) ने सांगितल्याप्रमाणे, फार्मासिटिकल, ऑटोमोबाईल आणि इलेट्रॉनिक्स अशा सेक्टरवर याआधीच याचा परिणाम झाला आहे. भारतातील फार्मा उद्योग औषधांच्या आयातीसाठी चीनवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. भारतात 70 टक्के अॅक्टिव्ह फार्मासिटिकल इंटीग्रेट अँड इंटरमीडिएट्स चीनमधून आयात केले जातात. गेल्या काही वर्षात चीनमधून आयात कऱण्याच प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. भारताने मागच्या वर्षी 249 अब्ज इतक्या किंमतीची औषधं चीनमधून आयात केली होती. तर भारताने मागच्या वर्षी 174 अब्ज इतक्या किंमतीचे अॅक्टिव्ह फार्मासिटिकल इंटीग्रेट अँड इंटरमीडिएट्स आय़ात केले आहेत. चीनमध्ये आतापर्यंत या कोरोनाव्हायरसमुऴे 1775 लोकांचा मृत्यू झाला आहे. WHO च्या विशेष तज्ज्ञांचा एक गट चीनमधील पेइचिंग इथे पोहोचला आहे. या व्हायसराच आभ्यास केला जाणार असून त्यावर लवकरात लवकर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. चीनबरोबरच इतर अनेक देशांभोवती कोरोनाव्हायरसने विळखा घातला आहे. जीवाची पर्वा न करता त्याने सुरक्षित उतरला तिरंगा, धावतच चढला 10 मजले
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या