Home /News /videsh /

तुरुंग अधिकाऱ्याला झाली फाशीची शिक्षा, असा घेतला होता 27 कैद्यांचा जीव

तुरुंग अधिकाऱ्याला झाली फाशीची शिक्षा, असा घेतला होता 27 कैद्यांचा जीव

जाणीवपूर्वक तुरुंगात दंगल घडवून कैद्यांच्या मृत्यूला जबाबदार ठरलेल्या तुरुंग अधिकाऱ्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

    कोलंबो, 13 जानेवारी: श्रीलंकेतील (Sri Lanka) एका तुरुंग अधिकाऱ्याला (Jail Officer) मृत्यूदंडाची शिक्षा (Death Sentence) सुनावण्यात आली आहे. श्रीलंकेतील सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) हा फैसला सुनावला आहे. तुरुंगात कैदेत असणाऱ्या 27 कैद्यांची हत्या केल्याचा आरोप या अधिकाऱ्यावर ठेवण्यात आला आहे. तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्यात अनेक साक्षीपुरावे तपासण्यात आल्यानंतर अखेर तुरुंग अधिकाऱ्याने कट आखून कैद्यांचा खून केल्याची बाब सिद्ध झाली आहे.  अशी घडली घटना श्रीलंकेतील वेलिकाडा तुरुंगात 2012 साली जाणीवपूर्वक दंगल घडवण्यात आली होती, असा आरोप तत्कालीन तुरुंग आयुक्त एमिल रंजन लमाहेवा याच्यावर ठेवण्यात आला होता. ठरलेल्या कटानुसार एकूण 33 कैद्यांना तुरुंगातच मारण्याची योजना असल्याची बाब तपासात समोर आली आहे. दंगा घडवून आणि चेंगराचेंगरीचा वापर करून कैद्यांचा बळी घेण्याची योजना एमिलने काही कैद्यांच्या मदतीनं आखल्याचं सिद्ध झालं आहे. कुणालाही संशय येणार नाही आणि सिद्ध करता येणार नाही, अशा पद्धतीने कैद्यांचा जीव घेण्याचा डाव आखण्यात आला होता.  अशी केली हत्या 2012 साली अचानक तुरुंगात कैद्यांकडचे मोबाईल आणि इतर साहित्याची झडती घेण्यासाठी धाड टाकण्यात आली. त्यामुळे कैदी गोंधळून गेले आणि एकच अफरातफरी सुरु झाली. कमी जागेत अनेक कैदी गोळा झाले आणि अगोदरच ठरवल्याप्रमाणे हिंसाचाराला सुरुवात झाली. या हिंसाचारात 27 कैद्यांनी आपला जीव गमावला, तर 10 जण गंभीर जखमी झाले.  हे वाचा - तीन वर्ष चालला खटला या प्रकरणाची सुनावणी तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे सुरु होती आणि ती तब्बल 3 वर्षं चालली. या प्रकरणी अगोदर वेगळ्याच अधिकाऱ्याला दोषी ठरवण्यात आलं होतं. मात्र तुरुंग आयुक्त एमिल रंजन याची ही योजना असल्याचं सिद्ध झाल्यानंतर त्या अधिकाऱ्याला निर्दोष मुक्त करण्यात आलं.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Death, Death Sentence, Murder, Prisoners, Sri lanka

    पुढील बातम्या