• Home
  • »
  • News
  • »
  • videsh
  • »
  • 'या' देशात पहिल्यांदाच महिला सैनिकांना सॅनिटरी उत्पादनांची सुविधा मिळणार

'या' देशात पहिल्यांदाच महिला सैनिकांना सॅनिटरी उत्पादनांची सुविधा मिळणार

ब्रिटनचे संरक्षण मंत्री जेम्स हेप्पे (James Happey) यांनी महिला सैनिकांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी सॅनिटरी उत्पादनं उपलब्ध करण्याची घोषणा नुकतीच केली आहे. यापूर्वी परदेशात सेवा बजावत असलेल्या महिला सैनिकांना स्वच्छताविषयक उत्पादनं स्वतःच घेऊन जावी लागत असत.

  • Share this:
ब्रिटन, 9 मार्च : ब्रिटनच्या (UK) सशस्त्र सैन्य दलातील (Armed Forces) महिला सैनिकांना (Female Soldiers) पहिल्यांदाच सॅनिटरी नॅपकिन्स (sanitary napkins) उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ब्रिटनचे संरक्षण मंत्री जेम्स हेप्पे (James Happey) यांनी महिला सैनिकांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी सॅनिटरी उत्पादनं उपलब्ध करण्याची घोषणा नुकतीच केली आहे. यापूर्वी परदेशात सेवा बजावत असलेल्या महिला सैनिकांना स्वच्छताविषयक उत्पादनं स्वतःच घेऊन जावी लागत असत. ही अतिशय खेदजनक व्यवस्था असल्याची टीका हेप्पे यांनी केली होती. आता प्रत्यक्ष कारवाया जिथं चाललेल्या असतील त्या ठिकाणच्या तळांवर देखील महिला सैनिकांसाठी एक ‘प्रोव्हिजन्स बॉक्स’ (Provisions Box) उपलब्ध करुन देण्यात येईल. ज्यामध्ये सॅनिटरी उत्पादनं आणि अतिरिक्त अंतर्वस्त्रं उपलब्ध असतील. ज्यामुळे महिला सैनिकांना आपल्याकडील सॅनिटरी उत्पादनं संपल्यावर काय अशी चिंता भेडसावणार नाही. त्याबाबतीत त्यांना निश्चिंत राहता येईल, असं हेप्पे यांनी स्पष्ट केलं. प्रोव्हिजन बॉक्सची सुविधा ही तात्पुरती सोय आहे. महिला सैनिकांना अन्नधान्याची रसद पुरवली जाते त्याचवेळी टँपॉन्ससारखी (Tampons) सॅनिटरी उत्पादनं पुरवण्यात येण्याची सोय करण्यात येणार आहे, असंही हेप्पे यांनी सांगितलं.

(वाचा - ‘या’देशांनं सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यास घातली बंदी, सार्वमतानंतर निर्णय)

ब्रिटनच्या सशस्त्र सेनादलात 11 टक्के महिला सैनिक आहेत. सैन्य कारवाई दरम्यान महिला सैनिकांना स्वच्छताविषयक उत्पादनं उपलब्ध करून जात नाहीत, त्यांना स्वतःच टँपॉन्स आणि पॅड बरोबर घ्यावे लागतात. स्त्रियांना दर अठ्ठावीस दिवसांनी मासिक पाळी येते, यात अनपेक्षित काही नसतं. त्यामुळे महिला सैनिकांना कारवाईच्या काळात मासिकपाळी आल्यास ती अचानक उद्भवणारी स्थिती असते, असं म्हणणं बरोबर नाही. याबाबतीत दुर्लक्ष करणं शक्य नाही, असं हेप्पे यांनी नमूद केलं. आता महिला सैनिकांना सनस्क्रीन, टॉयलेट पेपर आदी गरजेच्या वस्तू दिल्या जातात त्याचबरोबर त्यांना सॅनिटरी उत्पादनं पुरवली जातील. द टेलिग्राफने (The Telegraph) दिलेल्या वृत्तानुसार, लष्करातील पुरवठा यंत्रणेत रसद पुरवण्याच्या यादीत महिलांसाठी अत्यावश्यक असणाऱ्या अशा गोष्टींचा उल्लेख नाही, ही फार खेदाची बाब आहे, असं हेप्पे यांनी म्हटलं आहे.

(वाचा - असाही Women's Day! पहिल्यांदाच ट्रान्सजेंडर महिला बातम्या सांगणार)

या माजी ब्रिटीश सैन्य अधिकाऱ्यानं माजी इन्फंट्री अधिकारी म्हणून त्यांना उन्हापासून बचाव करण्यासाठीचे लोशन, टिश्यूपेपर, फूट पावडर, इनसेक्ट रिपेलंट आदी गोष्टी कशा पुरवल्या जायच्या याची आठवण सांगितली. लष्कराच्या रसद पुरवठा यंत्रणेनं कारवायांच्या काळात पुरुष सैनिकांना (Male Soldiers) अत्यावश्यक अशा सर्व गोष्टी पुरवल्या होत्या. मात्र महिला सहकाऱ्यांना त्यांच्या मासिक पाळीच्या काळात आवश्यक असलेल्या वस्तूही दिल्या नव्हत्या, असंही हेप्पे यांनी सांगितलं.
First published: