मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

असाही Women's Day! पहिल्यांदाच ट्रान्सजेंडर महिला बातम्या सांगणार; उद्यापासून तश्नुवा ऑन एअर

असाही Women's Day! पहिल्यांदाच ट्रान्सजेंडर महिला बातम्या सांगणार; उद्यापासून तश्नुवा ऑन एअर

पहिल्यांदाच Boishkahi TV ने ट्रान्सजेंडर महिलेची न्यूज अँकर (Transgender women News Anchor) म्हणून नियुक्ती केली आहे. या पहिल्या न्यूज अँकरचं नाव तश्नुवा आनन शिशिर (Tashnuva anan shishir) असं आहे.

पहिल्यांदाच Boishkahi TV ने ट्रान्सजेंडर महिलेची न्यूज अँकर (Transgender women News Anchor) म्हणून नियुक्ती केली आहे. या पहिल्या न्यूज अँकरचं नाव तश्नुवा आनन शिशिर (Tashnuva anan shishir) असं आहे.

पहिल्यांदाच Boishkahi TV ने ट्रान्सजेंडर महिलेची न्यूज अँकर (Transgender women News Anchor) म्हणून नियुक्ती केली आहे. या पहिल्या न्यूज अँकरचं नाव तश्नुवा आनन शिशिर (Tashnuva anan shishir) असं आहे.

  • Published by:  News18 Desk

ढाका, 07 मार्च : देश कोणताही असो, तेथील LGBTQ समुदायाला जराशी वेगळीचं वागणूक दिली जाते. केवळ एक माणूस म्हणून दर्जा मिळावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून LGBTQ समुदायाचा लढा सुरू आहे. विदेशात पुढारलेल्या काही देशांनी समान हक्क दिले आहेत. पण अद्यापही बऱ्याच देशात त्यांचा संघर्ष सुरूच आहे. वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर त्यांचा हा लढा सुरू आहे. अशातचं बांग्लादेशातून एक आशेचा किरण दाखवणारी बातमी समोर आली आहे. 1986 साली ब्रिटनमध्ये सर्वप्रथम एका ट्रान्सजेंडर महिलेची निवेदक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

बांग्लादेशच्या स्वातंत्र्य लढ्याला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं, बांग्लादेशात पहिल्यांदाच Boishkahi TV ने ट्रान्सजेंडर महिलेची न्यूज अँकर (Transgender women News Anchor) म्हणून नियुक्ती केली आहे. बांग्लादेशच्या या पहिल्या न्यूज अँकरचं नाव तश्नुवा आनन शिशिर (Tashnuva anan shishir) असं आहे. त्या एक प्रतिभावान मॉडेल आणि अभिनेत्री (Model And Actor) देखील आहेत. तश्नुवा आनन शिशिर या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभ मुहर्तावर 8 मार्च पासून एक न्युज अॅंकर म्हणून आपल्या नवीन कारकीर्दीला सुरूवात करणार आहे.

द डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, तश्नुवा आनन शिशिर यांनी 2007 साली नटुआ नावाच्या नाटक कंपनीसोबत आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली होती. या नाटक कंपनी सोबत तिने दोन वर्षांहून अधिक काळ काम केलं आहे. यादरम्यान त्या विविध कार्यक्रमात निवेदकाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसल्या आहेत. याव्यतिरिक्त चालू वर्षात त्या दोन फिचर चित्रपटही झळकणार आहेत.

हे ही वाचा- Food Delivery देणाऱ्या Swiggy ने पहिल्यांदाच केली तृतीयपंथीयाची नेमणूक, सपोर्ट ग्रुपही करणार सुरू

डेली बांग्लादेशच्या वृत्तानुसार, Boishkahi TV वाहिनीचे जनसंपर्क अधिकारी दुलाल खान यांनी माध्यमांना सांगितलं की, आम्ही आमच्या चॅनलच्या बातमी आणि नाटकाच्या टीममध्ये दोन ट्रान्सजेंडर महिलांची नियुक्ती केली आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी आणि महिला दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांची नियुक्ती केली आहे. स्वातंत्र्याच्या 50 वर्षांत यापूर्वी असं कधीही घडलं नाही. आता देशातील लोकांना प्रथमच एखादी ट्रान्सजेंडर महिला अधिकृतपणे बातम्या देताना दिसणार आहे.

हे ही वाचा- राष्ट्रवादीकडून तृतीयपंथी व्यक्तीची उपाध्यक्षपदी नेमणूक

त्यांनी पुढं सांगितलं की, 8 मार्च 2021 रोजी (सोमवारी) आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं तश्नुवा आनन शिशिर तिचं पहिलंच वृत्त बुलेटिन Boishkahi TV या वृत्तवाहिनीवर देणार आहे. या माध्यमातून Boishkahi TV देशात एक अभूतपूर्व उदाहरण उभं करणार आहे. एक डान्सर, मॉडेल आणि व्हाईस ओव्हर आर्टिस्ट असणाऱ्या तश्नुवा पहिल्या ट्रान्सजेंडर न्यूज अँकर म्हणून बातम्या देतील. तेव्हा बांग्लादेशातील हजारो ट्रान्सजेंडर महिलांना हे एक प्रेरणादायी ठरणार आहे.

First published:

Tags: Transgender