जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / एक्स गर्लफ्रेंडसोबत शारिरिक संबंध ठेवले, प्रियकराने केली वर्गमित्राची हत्या

एक्स गर्लफ्रेंडसोबत शारिरिक संबंध ठेवले, प्रियकराने केली वर्गमित्राची हत्या

अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात एका 17 वर्षांच्या मुलाने आपल्या एक्स गर्लफ्रेंडसोबत सोबत सेक्स केल्यामुळे वर्गमित्राची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    फ्लोरिडा, 30 ऑक्टोबर : अल्पवयीन मुलांमध्येही गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसत आहे. अमेरिकेत तर हे प्रमाण भारताच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा (Florida school murder) राज्यात एका 17 वर्षांच्या मुलाने आपल्या एक्स गर्लफ्रेंडसोबत सोबत सेक्स केल्यामुळे वर्गमित्राची हत्या (Classmate murdered for having sex with ex-girlfriend) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपीसह त्याची आताची प्रेयसी (Accused and his current girlfriend arrested) आणि आणखी एका मैत्रिणीला अटक करण्यात आली आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्वेट ग्रँट (Dwight Grant) असं हत्या झालेल्या मुलाचं नाव आहे. तो 18 वर्षांचा होता. आरोपीला जेव्हा हे समजलं, की ग्रँटने त्याच्या एक्स गर्लफ्रेंडसोबत सेक्स केलं आहे, तेव्हाच त्याने ग्रँटला मारण्याची योजना बनवली. यानुसार, आरोपीच्या आताच्या गर्लफ्रेंडने ग्रँटला सेक्सचे आमिष दाखवून त्याच्या अपार्टमेंटच्या आतल्या बाजूला नेले. आपत्कालीन पायऱ्यांच्या ठिकाणी (Stairwell) एकांत मिळेल, असं सांगून तिने ग्रँटला त्या ठिकाणी नेलं. हे दोघे पायऱ्यांकडे जात असतानाच आरोपीने मागून येत चाकू आणि तलवारीच्या (Attacked with knife and sword) साहाय्याने ग्रँटवर हल्ला केला. यात त्याच्या मानेवर आणि छातीवर वार करण्यात आले. यात आणखी एका तरुणीची मदत घेण्यात आली. आरोपीने या तरुणीला सांगितल, की ग्रँटने त्याच्या एका मैत्रिणीवर बलात्कार (accusation of rape) केला आहे. यामुळेच ती मदत करण्यास तयार झाली, असं तिने आपल्या जवाबात सांगितलं. मात्र, याबाबत तपास केला असता, आरोपीच्या एक्स गर्लफ्रेंडने सहमतीने ग्रँटसोबत संबंध (Ex-girlfriend had consensual sex) प्रस्थापित केले होते असं समजलं. आरोपीच्या एक्स गर्लफ्रेंडने स्वतःच ही बाब पोलिसांना सांगितली.

    डोंबिवली हादरली, बापानेच केला 9 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

    ही घटना 17 ऑक्टोबर रोजी घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व मिरामार हायस्कूलचे विद्यार्थी (Florida Miramar High School boy murdered) आहेत. हत्येच्या या घटनेचा काही भाग सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाला होता. या फुटेजच्या मदतीने तपासाला वेग मिळाला. अटक केल्यानंतर या तिघांवरही फर्स्ट डिग्री मर्डर, पुराव्यांशी छेडछाड करणे आणि गुन्हेगारी कट रचणे अशा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या पुराव्यामध्ये आरोपीने त्याच्या सध्याच्या गर्लफ्रेंडला केलेला एक टेक्स्ट मेसेजही होता, ज्यात लिहिलं होतं “लवकरच नक्की खून होईल.”

    आधी सुसाइड नोट लिहून घेतली मग दिला भंयकर मृत्यू; महिलेच्या हत्येनं मुंबई हादरली!

    ब्रोवार्डचे स्टेट अटर्नी हॅरॉल्ड प्रियॉर यांनी सांगितलं, की हे आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्यांना जास्तीत जास्त 3 वर्षांची कैद सुनावली जाईल. तसंच, तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही 21 वर्षांचे होईपर्यंत त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात येईल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात